NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का? काय आहे कारण? जाणून घ्या इंट्रेस्टिंग फॅक्ट्स

गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का? काय आहे कारण? जाणून घ्या इंट्रेस्टिंग फॅक्ट्स

आपण रस्त्यांवर रोज गाड्या पाहतो मात्र या गाड्यांचा टायरचा रंग हा काळाच का असतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण यामागिल इंट्रेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेणार आहोत.

16

तुम्हाला माहीत आहे का प्रत्येक गाडीच्या टायरचा रंग काळाच का असतो? मात्र लहान मुलांच्या सायकलचे टायरही पांढरे, लाल, पिवळे किंवा इतर रंगाचे असतात. मग मोठ्या गाड्यांचे टायर बनवणारी कंपनी पांढरा, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी किंवा इतर कोणत्याही रंगाचा टायर का बनवत नाही? तुमच्या मनात हा प्रश्न कधी आलाय का? केवळ भारतातच नाही तर परदेशातही वाहनांचे टायर काळ्या रंगाचे असतात. त्यामागे एक रहस्य दडलेले आहे. याच कारणामुळे सर्व टायर उत्पादक कंपन्या टायरचा रंग काळा ठेवण्यास प्राधान्य देतात. चला तर मग जाणून घेऊया टायरचा रंग काळाच का असतो.... 'टायर फुटणे अ‍ॅक्ट ऑफ गॉड नाही', मुंबई कोर्टाने विमा कंपनीला दिले नुकसान भरपाईचे आदेश

26

टायर काळे का असतात? : टायर हे रबरने तयार केले जातात हे तुम्हाला माहिती आहेच. पण नैसर्गिक रबरचा रंग राखाडी आहे, मग टायरचा रंग काळा कसा होतो? कारण टायर तयार करताना रबराचा रंग बदलला जातो आणि तो राखाडी होऊन काळा होतो.टायर बनवण्याच्या प्रक्रियेला व्हल्कनायझेशन म्हणतात. टायर बनवण्यासाठी रबरमध्ये ब्लॅक कार्बन देखील मिसळले जाते. ज्यामुळे रबर लवकर झिजत नाही. जर एक साधा रबर टायर 10,000 किमी धावू शकतो, तर कार्बन टायर एक लाख किमी किंवा त्याहून अधिक धावू शकतो. टायरमध्ये सामान्य रबर वापरल्यास ते लवकर झिजते आणि जास्त काळ टिकत नाही, म्हणून त्यात काळा कार्बन आणि सल्फर मिसळले जाते. त्यामुळे टायर बराच काळ टिकतो. कार खरेदी करण्याचा विचार करताय? मारुतीची 'ही' कार आहे सर्वगुणसंपन्न

36

काळ्या कार्बनचे अनेक प्रकार आहेत. रबर मऊ असेल किंवा टणक असेल हे त्यात मिसळल्या जाणाऱ्या कार्बनवर अवलंबून असते. मऊ रबरच्या टायर्सची पकड मजबूत असते परंतु हे टायर्स लवकर झिजतात. तर कडक रबर टायर्स सहज घासत नाहीत आणि जास्त काळ टिकतात. टायर बनवताना त्यात सल्फरही मिसळले जाते आणि कार्बन ब्लॅक असल्यामुळे ते अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासूनही वाचतात. तुम्ही टायर जळताना पाहिले असेल, तर त्यातून निघणारा धूर खूप काळा आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. त्यात असणाऱ्या कार्बन आणि सल्फरमुळे हा धूर काळा निघतो. 6 लाखांत मिळतेय 1200cc इंजिनची कार; जबदरस्त आहेत लूक, फीचर्स आणि मायलेज!

46

लहान मुलांच्या सायकलमध्ये पांढरे, पिवळे आणि इतर रंगांचे टायर बसवलेले असतात हे तुम्ही पाहिले असेलच. कारण म्हणजे मुलांच्या सायकली रस्त्यावर जास्त धावत नाहीत आणि मुलांच्या सायकलमध्ये काळा कार्बन मिसळला जात नाही. त्यामुळे हे टायर फार काळ टिकत नाहीत आणि लवकर झिजतात. या प्रकारच्या टायरला लो ग्रेड टायर असेही म्हणतात.

56

डोळ्यांना त्रास होत नाही : प्रत्यक्ष पाहिल्यास वाहनांच्या टायरचा रंग लाल किंवा पिवळा असेल तर तो रस्त्याच्या रंगाशी मॅच करत नाही. तसंच तो डोळ्यांनाही खुपतो, ज्यामुळे गाडी चालवणाऱ्या चालकाचा फोकस वारंवार बिघडू शकतो.

66

यामुळे गाडीच्या टायरमध्ये असतात चर : टायरवरील चरांमुळे टायरला रस्त्यावर घट्ट पकड मिळते. त्यामुळे टायर रस्त्यावर घसरत नाही. तसेच, या चरांमुळे रस्ता आणि टायरमधील घर्षण वाढते, ज्यामुळे टायर पुढे जाण्यास मदत होते. टायर झिजल्याने त्याची रस्त्यावरील पकड सुटते.

  • FIRST PUBLISHED :