देशातील करदात्यांसाठी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै असणार आहे. न्यू असेसमेंट ईयर 2023-24 हे 1 एप्रिलपासून सुरू होईल. साधारणपणे, ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै असते. हीच तारीख यंदाही टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख असेल अशी अपेक्षा आहे.
सरकारने विविध कारणांमुळे आयटीआर फाइलिंगची मुदत वाढवली आहे. मात्र, यंदा ही तारीख वाढवली जाणार नाही असा अंदाज आहे. याचं कारण देखील तसंच आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी नवीन ITR फॉर्म एक महिना अगोदर अधिसूचित केला आहे. नवीन ITR फॉर्म 10 फेब्रुवारी रोजी CBDT द्वारे अधिसूचित करण्यात आले होते आणि ते आयकर वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
वेळेवर न भरल्यास भरावा लागेल दंड: 1 एप्रिलपासून असेसमेंट ईयर 2023-24 सुरू होत आहे. यामुळे करदात्यांना 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये केलेल्या उत्पन्नाचे रिटर्न दाखल भरता येणार आहे. रिटर्न भरण्याची सुविधा 31 जुलैपर्यंत उपलब्ध असेल. असे न केल्यास तुम्हाला उशीरा ITR भरावा लागेल. त्यासाठी दंड आकारला जाईल. Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या 5 स्किम देतात जबरदस्त रिटर्न्स, लगेच करा गुंतवणूक!
ITR फॉर्ममध्ये कोणतेही मोठे बदल नाहीत: आयकर विभागाने गेल्या वर्षीच्या तुलनेत आयटीआर फॉर्ममध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. केवळ आयकर कायदा, 1961 मधील सुधारणांमुळे काही आवश्यक बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 2022-23 मध्ये कमावलेल्या उत्पन्नासाठी नागरिक, व्यावसायिक आणि कंपन्यांसाठी 10 फेब्रुवारी रोजी आयकर फॉर्म 1-6 नोटिफाय केले होते. टर्म प्लान खरेदी करण्याचा प्लान करताय? मग ही माहिती असायलाच हवी
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नोव्हेंबर 2022 मध्ये एक प्रस्ताव मांडला होता. ज्यामध्ये असे म्हटले होते की, ITR वगळता दुसऱ्या सर्व आयटीआर फॉर्मसाठी कॉमन फॉर्म असेल. इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग सोपे करण्यासाठी आणि वैयक्तिक आणि नॉन-बिझनेस टॅक्सपेयर्ससाठी ITR फाइलिंगमध्ये लागणारा वेळ कमी करण्यासाठी हे केले गेले.
कर विभागाने अधिसूचित केलेल्या नवीन ITR फॉर्ममध्ये क्रिप्टो आणि इतर व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी स्वतंत्र शेड्यूल समाविष्ट आहे. सरकारने बजेट 2022 मध्ये क्रिप्टो उत्पन्नावर कर आकारणीचे नियम जाहीर केले होते. LIC ची योजना तुमच्यावर करेल 'धनवर्षाव'! मिळेल जबरदस्त परतावा, लवकरच संपणार ऑफर