तुमचेही एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असतील आणि त्यामुळे तुम्ही त्या सर्वंच अकाउंटमध्ये दीर्घकाळापासून ट्रांझेक्शन करू शकत नसाल, तर बँक त्याला निष्क्रिय खात्याच्या श्रेणीत टाकते. तुम्ही अशा खात्यांमध्ये पैसे जमा करू शकता, परंतु काढू शकत नाही. अशा परिस्थितीत तुमचे कष्टाचे पैसे या खात्यांमध्ये पडून राहतात आणि गरजेच्या वेळी तुम्ही त्यांचा वापर करू शकत नाही. LIC पॉलिसी धारकांनो, 31 मार्चपूर्वी करा हे काम, अन्यथा...
म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला काही सोपे मार्ग सांगणार आहोत. ज्याद्वारे अशा निष्क्रिय खात्यातून म्हणजेच Inactive Account मधून पैसे काढता येतात. चला तर मग जाणून घेऊया ही प्रोसेस... PPF मधून जास्त नफा कमावण्याची सोपी ट्रिक, होईल जास्त फायदा!
Dormant Account अकाउंट म्हणजे काय?: डॉर्मंट अकाऊंटमधून पैसे काढण्याच्या पद्धती जाणून घेण्यापूर्वी, ही खाती कोणती आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. डोरमेंट अकाउंट सामान्यतः निष्क्रिय खाते म्हणून ओळखले जाते. जेव्हा दोन वर्षे किंवा अधिक दिवस कोणत्याही खात्यातून कोणताही व्यवहार होत नाही, तेव्हा बँक या खात्यांना वेगळ्या श्रेणीत ठेवते आणि नंतर त्यात जमा केलेले पैसे काढणे कठीण होते. या खात्यांमधून पैसे काढण्यासाठी, काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, जेणेकरून तुम्ही क्लेम करू शकाल.
खात्याची माहिती मिळवा- सर्वप्रथम तुमचे बँक खाते निष्क्रिय खाते म्हणून नोंदणीकृत आहे की नाही हे जाणून घ्या. यासाठी बँकेच्या वेबसाइटवर जाऊन माहिती मिळवता येईल. आरबीआयच्या नियमांनुसार, प्रत्येक बँकेला त्यांच्या वेबसाइटवर अशा खात्यांमधून आलेल्या अनक्लेम्ड रकमेचे डिटेल्स सादर करावे लागतात. Aadhaar Card धारकांचा 'आधार' बनला UIDAI, आता एका क्लिकवर होणार सगळी कामं
क्लेम फॉर्म भरा - तुम्हाला तुमचे खाते अनक्लेम्ड रकमेच्या श्रेणीमध्ये दिसल्यास, शाखेला भेट द्या आणि क्लेम फॉर्म भरा. यासोबतच केवायसी करणेही आवश्यक आहे.
नॉमिनींने अशा प्रकारे करावा अर्ज - जर अनक्लेम्ड रक्कम असणारे खाते तुमच्या नावावर नसेल आणि तुम्ही फक्त त्याचे नॉमिनी असाल, तर तुम्हाला क्लेम फॉर्मसह तुमचा ओळख पुरावा आणि खातेधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
बँकेद्वारे पडताळणी- या सर्व प्रक्रियेनंतर बँक सर्व गोष्टींची पडताळणी करते. जर सर्वकाही बरोबर आढळले तर तुम्हाला खात्याची संपूर्ण रक्कम मिळेल.