NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / UPI : क्रेडिट कार्डच्या माध्यमातून Google Pay वर UPI पेमेंट करता येते? पाहा सोपी प्रोसेस

UPI : क्रेडिट कार्डच्या माध्यमातून Google Pay वर UPI पेमेंट करता येते? पाहा सोपी प्रोसेस

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नुकतेच यूझर्ससाठी क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही Google Pay द्वारे तुमच्या RuPay क्रेडिट कार्डने कुठेही UPI पेमेंट करू शकता. परंतु बहुतेक लोकांना हे कसे करावे हे माहित नाही, म्हणून आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहूया...

15

तुमच्या RuPay क्रेडिट कार्डने UPI पेमेंट करण्यासाठी, तुम्ही पहिले क्रेडिट कार्ड Google Pay ने लिंक करणे आवश्यक आहे. ते लिंक करण्यासाठी, पहिले स्मार्टफोनवर Google Pay अॅप उघडा आणि त्याच्या सेटिंग्ज मेनूवर जा.

25

येथे तुम्हाला "Setup payment method" लिहिलेले दिसेल. त्यावर टॅप करा आणि "Add RuPay credit card" या ऑप्शन जा. येथे तुमच्या रुपे क्रेडिट कार्डचे डिटेल्स विचारले जातील.

35

येथे वर लिहिलेल्या RuPay क्रेडिट कार्ड क्रमांकाचे शेवटचे 6 नंबर टाका. त्याची कालबाह्यता तारीख आणि पिन देखील टाका. अशा प्रकारे तुमचे क्रेडिट कार्ड Google Pay शी लिंक केले जाईल. परंतु त्यातून पेमेंट करण्यासाठी, प्रथम पहिले ते अॅक्टिव्ह करावं लागेल.

45

ते अॅक्टिव्हेट करण्यासाठी, Google Pay अॅपवर जा आणि तुमच्या प्रोफाइलमधील "RuPay credit card on UPI'' वर टॅप करा. त्यानंतर तुमचे रुपे क्रेडिट कार्ड जारी केलेले बँक अकाउंट निवडा. यानंतर तुमचा युनिक UPI पिन सेट करा. आता तुमचे क्रेडिट कार्ड UPI पेमेंटसाठी तयार आहे.

55

त्याद्वारे पेमेंट करण्यासाठी, पहिले मर्चेंटच्या पेमेंट इंटरफेसवर, पेमेंट ऑप्शन म्हणून UPI ​​निवडा. येथे UPI आयडी एंटर करा किंवा QR कोड स्कॅन करा. त्यानंतर पेमेंट रक्कम एकदा चेक करा आणि तुमचा UPI पिन टाकून पेमेंट पूर्ण करा.

  • FIRST PUBLISHED :