NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / AC Tips : तुमच्या AC मॉडलमध्ये ही टेक्नॉलॉजी आहे का? अर्ध होईल वीज बिल

AC Tips : तुमच्या AC मॉडलमध्ये ही टेक्नॉलॉजी आहे का? अर्ध होईल वीज बिल

AC Tips : उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होते. यावेळी त्वरित आराम मिळावा म्हणून लोक फक्त एसी वापरतात. पण, एसी वापरल्याने वीज बिल खूप जास्त येतं. पण एसीमध्ये असलेल्या एका टेक्नॉलॉजीमुळे ते कमी केलं जाऊ शकतं. ते कसं हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

16

या सीझनमध्ये तुम्ही नवीन एसी घेणार असाल किंवा भाड्याने एसी घेणार असाल. तुम्ही नवीन ठिकाणी शिफ्ट होत आहात जिथे AC आधीच बसवलेला आहे. तर आजच तुमच्या एसीकडे लक्ष द्या. कारण आज आम्ही अशा एका टेक्नॉलॉजीविषयी सांगणार आहोत. ज्यामुळे वीज बिल खूप कमी येते.

26

आज आपण बोलत आहोत एसीमध्ये सापडणाऱ्या इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीविषयी. म्हणजेच नॉन-इनव्हर्टर एसीच्या तुलनेत, इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी असलेले एसी मोठ्या प्रमाणात विजेची बचत करतात. त्यामुळे जर तुम्ही वापरत असलेली इन्व्हर्टर एसी असेल तर समजू की तुमची विजेची खूप बचत होणार आहे. तुमच्या घरात एसी आधीच बसवलेला असेल पण तुम्ही इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीकडे लक्ष दिलेले नसेल. तर आजच लक्ष द्या कारण यामुळे तुम्हाला वीज बिल खूप कमी येणार आहे.

36

आता इन्व्हर्टर एसी विजेची बचत कशी करतात ते समजून घेऊ. पारंपारिक एसीमध्ये कंप्रेसर फिक्स्ड स्पीडने चालतो. म्हणजे सेट तापमानापर्यंत पोहोचण्यासाठी ते बंद असतं किंवा चालू असतं. तर इन्व्हर्टर एसीमध्ये व्हेरिएबल स्पीड कॉम्प्रेसर आहे जो कूलिंगच्या डिमांडनुसार त्याचा वेग अॅडजस्ट करतो. तो वेगवेगळ्या स्पीडवर सतत चालत राहतो.

46

इन्व्हर्टर एसी सभोवतालच्या परिस्थितीनुसार आणि कूलिंगच्या गरजेनुसार कंप्रेसरची स्पीड अॅडजस्ट करून कूलिंग क्षमता सुधारू शकतात. नंतर सेट तापमानापर्यंत पोहोचल्यानंतर, कंप्रेसर स्लो होतो आणि एनर्जी कंजप्शन कमी करतो. त्याचप्रमाणे, तापमानात मोठा फरक असताना, कॉम्प्रेसर वेगाने चालून खोली थंड करते.

56

या फ्लेक्सिबिलिटीमुळे, इन्व्हर्टर एसी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतो आणि ऊर्जेचा वापर ऑप्टिमाइज करतो. इनव्हर्टर नसलेल्या एसीमध्ये, कंप्रेसर वारंवार ऑन-ऑफ होत असल्याने खूप वीज लागते.

66

एकूणच, इन्व्हर्टर एसी कंप्रेसर स्पीड कंट्रोल, कमी स्टार्ट-स्टॉप सायकल आणि टेम्परेचर स्टेबिलिटी यांच्या कॉम्बिनेशनमुळे बरीच वीज वाचवतात. काही स्टडीमध्ये असे दिसून आलेय की, वेगवेगळ्या कंडीशन आणि यूज पॅटर्नच्या हिशोबाने नॉन-इनव्हर्टर एसीच्या तुलनेत 30 ते 50 टक्केपर्यंत वीजेची बचत करतात.

  • FIRST PUBLISHED :