NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Elon Musk पुन्हा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; गौतम अदानींचा नंबर कितवा?

Elon Musk पुन्हा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; गौतम अदानींचा नंबर कितवा?

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्याचबरोबर गौतम अदानी 38 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

15

गेल्या वर्षी मोठ्या तोट्यामुळे टेस्लाचे सीईओ एलोन मस्क जगातील अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरले होते. मात्र या वर्षी संपत्तीत झालेल्या वाढीमुळे ते आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ट्विटर आणि टेस्लाच्या बॉसने फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्टला मागे सोडले आहे.

25

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बर्नार्ड अरनॉल्टने एलोन मस्कला मागे टाकले होते. कारण एलोन मस्क यांची संपत्ती 200 अब्ज डॉलरच्या खाली गेली होती आणि अरनॉल्डची संपत्ती वाढली होती. ब्लूमबर्ग बिलियनेर्सच्या रिपोर्टनुसार, एलोन मस्कने अवघ्या 2 महिन्यांत पुन्हा पहिल्या क्रमांक गाठला आहे. पण फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत ते अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

35

एलोन मस्कची संपत्ती किती? : ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, एलोन मस्क यांची एकूण संपत्ती 187 अब्ज डॉलर झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेल्या बर्नार्ड अर्नॉल्टची एकूण संपत्ती 185 अब्ज डॉलर आहे. एलोन मस्क यांच्या संपत्तीत यावर्षी विक्रमी वाढ झाली आहे. जानेवारीपासून मस्कने त्यांच्या संपत्तीत 50.1 अब्ज डॉलरची भर घातली आहे. सोमवारी एलोन मस्कच्या संपत्तीत 6.98 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

45

गेल्या वर्षी झाले होते मोठे नुकसान: 2021 या वर्षात टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांची संपत्ती 200 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये त्यांच्या संपत्तीत इतकी घसरण झाली होती की, ती 150 अब्ज डॉलरच्या खाली आली होती. मस्कच्या संपत्तीतील ही घसरण टेस्लाच्या शेअर्सच्या विक्रीमुळे झाली होती. आता FD वरही करता येणार जबदरस्त कमाई! 'या' बँका देताय 9.50% व्याज

55

गौतम अदानी 38 व्या क्रमांकावर पोहोचले : फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी 38 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 33.4 अब्ज डॉलर्स आहे. दुसरीकडे, ब्लूमबर्गच्या यादीत गौतम अदानी 32 व्या क्रमांकावर आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 37.7 अब्ज डॉलर आहे. 1 मार्चपासून होणार हे मोठे बदल, तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम!

  • FIRST PUBLISHED :