NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / PPF मधून जास्त नफा कमावण्याची सोपी ट्रिक, होईल जास्त फायदा!

PPF मधून जास्त नफा कमावण्याची सोपी ट्रिक, होईल जास्त फायदा!

PPF अकाउंट असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पीपीएफ अकाउंटवर जास्त नफा कसा मिळवता येईल याची एक सोपी ट्रिक आपण जाणून घेणार आहोत.

16

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे गुंतवणुकीसाठी अतिशय सुरक्षित आणि चांगले साधन मानले जाते. तुम्ही पीपीएफ खात्यात एसआयपी किंवा एकरकमी गुंतवणूक करू शकता. या खात्याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही केवळ 500 रुपयांच्या छोट्या रकमेतून गुंतवणूक सुरू करू शकता. परंतु जर तुम्हाला पीपीएफ खात्यातून अधिक नफा मिळवायचा असेल तर एक खास ट्रिक आहे. ही ट्रिक माहिती झाली तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकेल.

26

तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी पीपीएफ खात्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्या महिन्याचे व्याजही मिळू लागेल. PPF खात्यावर तुम्हाला 7.1 टक्के व्याज मिळते. हे व्याज दरवर्षी चक्रवाढ होते. सरकार दरवर्षी व्याजदर निश्चित करते आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर ते तुमच्या खात्यात जोडते. लेकीच्या लग्नाचं टेंशन घेत असाल तर डोंट वरी! ही स्किम देतेय लाखो रुपये

36

तुम्ही कोणत्याही महिन्याच्या 5 तारखेपूर्वी पीपीएफ खात्यात गुंतवणूक केल्यास, त्या महिन्याच्या व्याज मोजणीसाठी तुमची जमा राशी देखील विचारात घेतली जाईल. येथे खेळ असा आहे की, जर तुम्ही त्या महिन्याच्या 5 तारखेनंतर पैसे जमा केले तर तुम्हाला त्या महिन्याच्या व्याजापासून वंचित राहावे लागेल. हे व्याज पुढील महिन्याच्या जमा रकमेवर जोडले जाईल, परंतु त्या महिन्याच्या 5 दिवसांचे व्याज जोडले जाणार नाही. होम लोनचा EMI वाढला असेल तर नो टेंशन! हा पर्याय आहे बेस्ट

46

पीपीएफमध्ये गुंतवणूक वर्षाच्या सुरुवातीलाच करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे, तुम्हाला संपूर्ण वर्षभर जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत राहील. अशा परिस्थितीत, ज्या गुंतवणूकदारांना पीपीएफमध्ये एकरकमी गुंतवणूक करायची आहे. त्यांना जास्त व्याजाचा लाभ घ्यायचा असेल, तर 5 एप्रिलपूर्वी गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक करत असाल, तर पैसे दर महिन्याच्या 5 तारखेपूर्वी जमा केले पाहिजेत.

56

PPF कराच्या EEE श्रेणीत येतो. म्हणजेच योजनेत केलेल्या संपूर्ण गुंतवणुकीवर टॅक्स सूट मिळेल. याशिवाय त्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कमही टॅक्स फ्री असते. त्यामुळे, लॉन्ग टर्म बेनिफिट्सनुसार, PPF गुंतवणूक हा एक चांगला पर्याय मानला जातो.

66

प्री-विड्रॉवलसाठी, PPF खात्यातील लॉक-इन पीरियड 5 वर्षांसाठी ठेवण्यात आला आहे. म्हणजे खाते उघडल्याच्या वर्षानंतर 5 वर्षांपर्यंत या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, फॉर्म 2 भरून प्री-विड्रॉवल करता येईल. मात्र, 15 वर्षापूर्वी मॅच्युरिटी काढता येत नाही.

  • FIRST PUBLISHED :