NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / 6 लाखांत मिळतेय 1200cc इंजिनची कार; जबदरस्त आहेत लूक, फीचर्स आणि मायलेज!

6 लाखांत मिळतेय 1200cc इंजिनची कार; जबदरस्त आहेत लूक, फीचर्स आणि मायलेज!

गेल्या वर्षी 2022 मध्ये लाँच केलेली, सिट्रोएन C3 ही हॅचबॅक कार आहे. ही कार SUV सारखी दिसते. कारच्या आत एक मोठं केबिन आहे, ज्यामध्ये 5 लोकांसाठी जागा आहे. लूक, फीचर्स आणि मायलेज सर्व काही जबरदस्त आहे.

15

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीची एक वेगळीच हवा आहे. या कंपनीच्या कारची मागणी खूप जास्त आहे. एवढंच काय तर आपण टॉप 10 गाड्यांची लिस्ट पाहिली तर त्यातील 6 गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मारुतीच्या गाड्या या परवडतील अशा आहेत.

25

या गाड्यांचे डिझाइन आणि फीचर्सही चांगले आहेत. आता भारतीय बाजारात एक अशी कार आली आहे जी मारुती वॅगनआर आणि बलेनो सारख्या कारला टक्कर देतेय. या कारची किंमतही केवळ 6 लाख रुपये आहे. ही कार फ्रेंच कंपनी Citroën ने लॉन्च केली आहे. तिचे नाव C3 आहे. TATAची सर्वाधिक विक्री होणारी एसयुव्ही, पाहा फीचर्स आणि किंमत

35

Citroen C3 ही कार गेल्यावर्षी 2022 मध्येच लाँच झाली. SUV सारखी दिसणारी ही हॅचबॅक कार आहे. कारच्या आत एक मोठं केबिन आहे, ज्यामध्ये 5 लोकांसाठी जागा आहे. बाहेरच्या हायलाइट्समध्ये स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन, सिग्नेचर ड्युअल-स्लॅट क्रोम ग्रिल, फॉग लाइट्स, सिल्व्हर स्किड प्लेट्स, व्हील कव्हर्ससह 15-इंच स्टील व्हील, स्क्वेअर टेललाइट्स आणि मागील-बंपर माउंटेड नंबर प्लेट रिसेस यांचा समावेश आहे.

45

1200cc इंजिन : Citroen C3 ची ऑन-रोड किंमत रु.7.04 लाख पासून सुरू होते आणि रु.9.65 लाखांपर्यंत जाते. कारला 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळते. ज्याला 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. हे इंजिन 109bhp पॉवर आणि 190Nm टार्क निर्माण करते. तर सामान्य इंजिन 81bhp पॉवर आणि 115Nm टार्क निर्माण करते.

55

शानदार आहेत फीचर्स : या कारच्या इंटीरियरमध्ये 10-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी हाइट-अॅडस्टेबल ड्रायव्हर सीट, रिमोट की-लेस एंट्री, चार स्पीकर, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल आणि टिल्ट-अॅडजस्टेबल स्टीयरिंग आहेत. यासोबतच कारमध्ये अनेक फीचर्सही मिळत आहेत.

  • FIRST PUBLISHED :