NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / स्वराज्यातील किल्ल्यांसाठी शिवाजी महाराजांनी लिहिलेलं दुर्मीळ पत्र! पाहा Photos

स्वराज्यातील किल्ल्यांसाठी शिवाजी महाराजांनी लिहिलेलं दुर्मीळ पत्र! पाहा Photos

Kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील किल्ल्यांसाठी लिहिलेलं दुर्मीळ पत्र कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहे.

  • -MIN READ

    Last Updated: February 27, 2023, 10:30 IST
110

कोल्हापूर पुरलेखागार कार्यालयात महाराणी ताराबाई यांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर संस्थानच्या संदर्भातील अनेक कागदपत्रे आणि छायाचित्रे जतन करण्यात आलेली आहेत.

210

कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी १९०२ साली इंग्लंडला भेट दिली होती. यावेळचा त्यांचा एक फोटो देखील जतन करण्यात आला आहे.

310

शाहू महाराजांच्या राजवटीतील कोल्हापूर शहराचा 1912 सालचा नकाशा देखील इथं पाहायला मिळतो.

410

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ 1894 साली पार पडला होता. त्यावेळचा फोटो देखील आहे.

510

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ प्रसंगीचे महाराजांचे पहिले गॅझेट यात उपलब्ध आहे.

610

राजर्षी छत्रपती शाहूराजांनी त्यावेळी किल्ले पन्हाळगडावर चहाचा मळा फुलवला होता. तर कोल्हापुरात बाहेरील व्यापाऱ्यांसाठी शाहूपुरी व्यापारी पेठेला सुरुवात केली होती. याचे दुर्मिळ फोटो देखील पाहता येतात.

710

26 जुलै 1902 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. मागासवर्ग प्रवर्गातील नागरिकांना शासकीय नोकरीत 50% आरक्षण या आदेशानुसार मिळाले होते.

810

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील विविध राजमुद्रा देखील इथं जतन केलेल्या आहेत.

910

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील काही दस्तऐवज देखील इथे ठेवले आहेत. स्वराज्यातील प्रमुख गडकोटांच्या बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी 1,75,000 होनांची तरतुद केल्याबाबतचे इ.स. 1671-1672 सालचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र याठिकाणी आहे.

1010

पुणे, इंदापूर, चाकण, सुपे, बारामती येथील हिंदू आणि मुसलमान लोकांचे वतन अफजलखानाच्या स्वारीच्या अगोदर ज्याप्रमाणे होते, त्याप्रमाणे चालवण्याबाबत लिहिलेल्या दिनांक 18 डिंसेंबर 1660 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्राचाही यामध्ये समावेश आहे.

  • FIRST PUBLISHED :