सध्या सणासुदीच्या निमित्ताने महिला पारंपरिक काठापदराच्या आणि पैठणी साड्या नेसणे पसंत करतात.
साडी जितकी सुंदर आहे तेवढाच सुंदर आपलं ब्लाऊज डिझाईन असावं अशी सर्वांची इच्छा असते.
सध्या पैठणी ब्लाऊजवर सुंदर नक्षीकाम करण्याचा ट्रेंड आहे.
पैठणीच्या ब्लाऊजवर नक्षीकाम केल्यामुळे तो अधिकच खुलून दिसतो.
पैठणीच्या ब्लाऊजवर मोर, पोपट, पक्षी इत्यादींचे नक्षी अधिक सुंदर दिसतात.
पारंपरिक पैठणीवर अशा प्रकारचे फॅन्सी ब्लाऊज देखील सुंदर दिसतात.
पैठणी ब्लाऊजला वेगळा लूक देण्यासाठी त्यावर मण्यांचे आणि डायमंडच्या खड्यांचे डिझाईन देखील ट्रेंडमध्ये आहेत.
मणी आणि डायमंडचे नक्षीकाम पारंपरिक पैठणी साडीला वेगळा लूक देते. मग वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना किंवा वटपौर्णिमेचे उखाणे घेताना तुम्हीही छान साडी लुकमध्ये नक्की भाव खाऊन जा.