महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वन अँड ओन्ली दत्तू मोरे नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.
दत्तूच्या लग्नाचे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. पण दत्तूची बायको नेमकी आहे कोण? तिचं नाव काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
दत्तूने आजवर कधीच त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल कोणतीही माहिती समोर येऊ दिली नव्हती. त्यामुळे त्याच्या बायकोबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते आतूर आहेत.
दोघांच्या जोडीवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमनं दत्तू आणि स्वातीला शुभेच्छा दिल्यात.