सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत अभ्या आणि लतिका प्रमाणेच हिट झाला तो या मालिकेतील दौलत.
त्याने या मालिकेत नकारात्मक पात्र साकारलं असलं तरी तो घराघरात पोहचलेला आणि लोकप्रिय झाला.
आता तो लवकरच नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दौलत म्हणजेच अभिनेता ऋषी शेलार झी मराठीवरील नव्या मालिकेत दिसणार आहे.
नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' असं या मालिकेचं नाव असून ही मालिका 13 मार्चपासून, सोम ते शनि, रात्री 8 वाजात सुरु होत आहे.
या मालिकेत त्याच्या सोबत नायिका म्हणून अभिनेत्री शिवानी रांगोळे दिसणार आहे.
आता दौलतला आतापर्यंत नकारात्मक भूमिकेत पाहिलेलं असताना नवी भूमिकेत पाहणं चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल.