NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Shiv Thakare Exclusive: कसं झालं शिवचं बिग बॉसमध्ये सिलेक्शन? अनेक वर्ष करत होता प्रयत्न

Shiv Thakare Exclusive: कसं झालं शिवचं बिग बॉसमध्ये सिलेक्शन? अनेक वर्ष करत होता प्रयत्न

बिग बॉस 16 चा फर्स्ट रनरअप शिव ठाकरे शो संपल्यानंतर त्याच्या मुळ गावी अमरावतीमध्ये परतला. शिवनं न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुसिव्ह गप्पा मारल्या. शिवची बिग बॉस 16साठी निवड कशी झाली याविषयी त्यानं पहिल्यांदा माहिती दिली.

111

बिग बॉस मराठी 2चा विजेता शिव ठाकरेनं बिग बॉस 16मध्ये जाऊनही प्रेक्षकांची मनं जिंकली.

211

एमसी स्टेन बिग बॉस 16चा विजेता ठरला तर शिव ठाकरे शोचा फर्स्ट रनरअप ठरला.

311

बिग बॉसच्या प्रवास संपवून शिव ठाकरे अखेर त्यांच्या घरी म्हणजेच अमरावतीला आला आहे.

411

अमरावतीत येताच शिवचं जंगी स्वागत करण्यात आलं. हे सगळं पाहून शिव भारावून गेला.

511

मराठमोळा शिव ठाकरे बिग बॉस 16मध्ये गेल्यानं राष्ट्रीय स्थरावर त्याला ओळख मिळाली. बिग बॉसमध्ये नेमकं त्याचं सिलेक्शन कसं झालं हे शिवनं न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं.

611

शिव म्हणाला, 'खरंतर बिग बॉससाठी ऑडिशन नसतं. सिलेक्शन असतं. ते लोक स्वत: मोठ्या स्टार्सना फोन करतात. त्या स्टारमध्ये ते डिफरंट पर्सनॅलिटी बघतात. त्यांना मराठी मुलगा हवा होता'.

711

'आता आपल्याला कोण कॉल करणार नाही. पण मला बिग बॉस मराठीमुळे फेम मिळालं होतं. मी कधीच कामाची वाट पाहत नाही. मी कामासाठी स्वत: समोरच्याला कॉल करतो'.

811

'बिग बॉसमध्ये पहिले 2-3 वर्ष अनेकांना ऑफर्स येतात. पण ते रिजेक्ट करतात. पण मी त्यांना स्वत: कॉल करायचो. कधी कधी ते फोन उचलायचे नाहीत. अनेक वेळा ते रिजेक्ट करायचे. म्हणायचे नाही होणार'.

911

'मी अनेक वर्ष प्रयत्न करत होतो. हो नाही हो नाही करत आता कुठे माझा नंबर लागला. आता चॅलेन माझ्याबरोबर जोडलं गेलं आहे. आता समोरून मला कॉल येतात की हा शो करणार का'.

1011

'इतरांना कामासाठी फोन येतात पण मला कामासाठी तेवढी जागा निर्माण करण्यासाठी फोन करावे लागतात'.

1111

'मी एका छोट्या शहरातून आहे. माझ्या घरी या इंडस्ट्रीतील कोणी नाही. त्यामुळे कामासाठी मला कोणाला कॉल करावा लागतो याचं मला काही वाईट वाटत नाही', असं शिव म्हणाला.

  • FIRST PUBLISHED :