सध्या सगळीकडे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची तुफान चर्चा आहे.
प्राजक्ताचे घराघरात चाहते आहेत. प्राजक्ता लग्न कधी करणार, तिचा बॉयफ्रेंड कोण हे जाणून घ्यायला चाहते कायमच उत्सुक असतात.
नुकतंच प्राजक्ताने एका मुलाखतीत तिच्या क्रश विषयी खुलासा केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्राजक्ताचा क्रश असल्याचं तिने नुकतंच सांगितलं आहे.
एका मुलाखतीत ‘प्राजक्ताला तुझा मराठी सिनेसृष्टीतील क्रश कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने उत्तर दिले.
'माझा सिनेसृष्टीतील नानी नावाचा सुपरस्टार क्रश आहे. पण मराठी सिनेसृष्टीतील क्रशबद्दल बोलायचं तर अभिनेता वैभव तत्त्ववादी हा माझा एकेकाळी क्रश होता.' असा खुलासा तिने केला आहे.
एवढंच नाही तर प्राजक्ताने तिच्या आईला 'हा तुला जावई म्हणून चालेल का' असे देखील विचारले होते.
वैभव तत्ववादीच्या 'कॉफी आणि बरंच काही' या चित्रपटानंतर तिचा तो क्रश झाला होता. पण प्राजक्ताने त्याला हे कधीच सांगितलेलं नाही.
वैभव आणि प्राजक्ता एकमेकांचे चांगले मित्र आहेत. लवकरच या दोघांचा एक चित्रपट सुद्धा येणार आहे.