नीता अंबानींच्या कल्चरल सेंटरचं मोठ्या उत्साहात उद्घाटन झालं.
नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र हे भारतातील पहिलं बहुविद्याशाखीय सांस्कृतिक क्षेत्र मुंबईत सुरू झालं आहे.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर ग्लोबल म्युझियम स्टँडर्ड अंतर्गत तयार करण्यात आलं आहे.
भारत आणि जगभरातील कलात्मक प्रदर्शनांचे जतन केलं जाणार आहे. हे सांस्कृतिक केंद्र हायटेक सुविधांनी सुसज्ज आहे.
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये डायमंड बॉक्स, स्टुडिओ थिएटर, आर्ट हाऊस आणि सार्वजनिक कला अशा अनेक गोष्टी आहेत.
या सेंटरमध्ये प्रेक्षकांना जागतिक दर्जाचा अनुभव घेता येणार आहे. ग्रँड थिएटरमधील प्रत्येक प्रदर्शन हा प्रेक्षकांना तल्लीन करणारा अनुभव असणार आहे.
त्याचप्रमाणे एंटीग्रेटेड डॉल्बी अॅटमॉस सराउंड साउंड सिस्टम आणि व्हर्च्युअल साउंड सिस्टम देखील तयार करण्यात आली आहे.
सांस्कृतिक केंद्रामध्ये 3 हाय-टेक स्टुडिओ असतील. ज्यात 2,000 आसन क्षमतेचे ग्रँड थिएटर त्याचप्रमामे 250 आसनांचे एडवांस स्टुडिओ थिएटर आणि 125 डायनॅमिक सीट क्यूब थिएटर यांचा समावेश आहे. तसंच या सांस्कृतिक केंद्रात 4 मजली कलागृह देखील आहे.
NMACC वर बोलताना नीता अंबानी म्हणाल्या, 'भारतीय कलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध' आहोत असं म्हणाल्या आहेत.