NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Kartik Aryan: फक्त 10 दिवसांसाठी कार्तिकने आकारले 'इतके' कोटी; म्हणाला 'मी बॉलिवूडचा नंबर 1...'

Kartik Aryan: फक्त 10 दिवसांसाठी कार्तिकने आकारले 'इतके' कोटी; म्हणाला 'मी बॉलिवूडचा नंबर 1...'

कार्तिक आर्यन सध्या बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेत्यांपैकी एक बनला आहे. मागच्या वर्षात त्याचा 'भूल भुलैय्या २' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता सिनेमात फी आकारण्याबद्दल त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

18

'प्यार का पंचनामा' या डेब्यू चित्रपटासाठी अभिनेत्याला 1.25 लाख रुपये मिळाले होते. पण आता चित्रपटासाठी घेण्यात येणाऱ्या मानधनामध्ये कार्तिकने प्रचंड वाढ केली आहे.

28

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यनला निर्माता राम माधवानी यांनी 2021 साली रिलीज झालेल्या धमाका चित्रपटाच्या केवळ 10 दिवसांच्या शूटिंगसाठी 20 कोटी रुपये मानधन दिले होते.

38

अलीकडेच त्याने एका मुलाखतीदरम्यान 20 कोटी रुपये आकारल्याबद्दल मोठं भाष्य केलं आहे.

48

कार्तिक आर्यन अलीकडेच एका शोमध्ये दिसला जिथे त्याला विचारण्यात आले की त्याच्या 'पहिल्या चित्रपटातून 1.25 लाखांची कमाई केल्यानंतर तो आता 20 कोटींची मागणी करत आहे. त्यावर कार्तिकने उत्तर दिले कारण मी नंबर वन हिरो आहे.

58

या मुलाखतीत तो म्हणाला, 'निर्माते मला केवळ दहा दिवसांसाठी 20 कोटी रुपये द्यायला तयार होतात कारण मी त्यांचे पैसे डबल करून देतो.'

68

याशिवाय कार्तिकने मुलाखतीदरम्यान असेही सांगितले की, 2022 मध्ये रिलीज झालेल्या भूल भुलैया 2 चित्रपटाच्या यशानंतर तो स्वत:ला नंबर वन हिरो मानू लागला आहे. मी बॉलिवूडचा राजकुमार आहे.'

78

कार्तिकच्या या वक्तव्याची आता सगळीकडे चर्चा होत आहे.

88

अभिनेता कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया नंतर, फ्रेडी हा चित्रपट डिस्ने + हॉटस्टारवर दिसला. आता त्याचा क्रिती सेननसोबत शहजादा हा चित्रपटही येणार आहे.

  • FIRST PUBLISHED :