NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Happy Father's Day : 'बाबा आमचा सुपरस्टार'; मराठीतील कूल डॅडी आणि त्यांची मुलं

Happy Father's Day : 'बाबा आमचा सुपरस्टार'; मराठीतील कूल डॅडी आणि त्यांची मुलं

मराठीमध्ये 'बाप' काम करणारे काही मोजके कलाकार आणि त्यांची मुलं अशा प्रसिद्ध जोड्या तुम्हाला माहित आहेत का?

111

मराठीतील अनेक अभिनेते आज एक उत्तम वडील म्हणून सुद्धा जगात वावरत आहेत. त्यांच्या मुलांना तुम्ही ओळखता का?

211

श्रेयस तळपदे सध्या यशवर्धनच्या भूमिकेत छोट्या परीचा बाबा म्हणून सगळी जबाबदरी नीट पार पाडत आहे. पण खऱ्या आयुष्यात सुद्धा त्याला आद्या नावाची गोड मुलगी आहे.

311

खासदार दौलतराव अर्थात अभिनेता आदिनाथ कोठारेच्या मुलीला तर सगळेच ओळखतात. जिजा आणि डॅडीचा खास संवाद सुद्धा आदिनाथ अनेकदा पोस्ट करताना दिसतो

411

अभिनेता कैलास वाघमारे नुकताच बाबा झाला असून त्याच्या नव्या जबाबदाऱ्यांमुळे तो भलताच खुश आहे

511

दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी सुद्धा अगदी नवीनच 'बाप'माणूस झाला आहे. विहा या त्याच्या गोड मुलीचे फोटो आणि गोंडस विडिओ तो कायम शेअर करत असतो.

611

अभिनेता अंकित मोहन नवा नवाचं बाबा झाला आहे. रुआन असं त्याच्या मुलाचं नाव आहे.

711

जितेंद्र जोशी हा अभिनेता सुद्धा एक जबाबदार पिता आहे. त्याची मुलगी रेवा ही त्याच्या फार जवळची आहे.

811

अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक सुद्धा मयंक आणि सार्थक अशा दोन मुलांचा वडील आहे. त्याची दोन्ही मुलं शिकून आता स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत.

911

प्रसिद्ध गायक आणि अभिनेता राहुल देशपांडेच्या मुलीबद्दल तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांचे अनेक व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध झाले होते.

1011

वागले की दुनिया मालिकेत दोन मुलांचा वडील दाखवलेला अभिनेता सुमीत राघवन खऱ्या आयुष्यातसुद्धा दोन मुलांचा बाप आहे. नीरद आणि दिया अशी दोन मुलं त्याला आहेत.

1111

अभिनेता पुष्कर जोग सुद्धा एक कूल डॅडी आहे. त्याची मुलगी फेलिशा सोबत तो कायमच धमाल करताना दिसतो. या सर्व अभिनेत्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा (Happy Fathers Day)   न्यूज18लोकमत कडून. 

  • FIRST PUBLISHED :