गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या.
भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि डॉ. निलेश साबळे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं.
चला हवा येऊ द्यामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या कामाचे किती पैसे मिळत असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना.
तर सुरूवात करूया अभिनेत्री श्रेया बुगडेपासून. श्रेया ही हवा येऊ द्याच्या ग्रुपमधील पहिली महिला विनोदवीर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, श्रेया एका भागासाठी 80 हजार रूपये मानधन घेते.
त्यानंतर पोस्टमन बनून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा अभिनेता सागर कारंडे एका भागासाठी 70 हजार रूपये मानधन घेतो.
कलाकारांच्या मानधनातील मोठी बाब म्हणजे एखाद्या एपिसोडमध्ये एखाद्या कलाकारानं स्त्री वेश केला तर त्याला त्याचे 5 हजार अधिक मिळतात.