पवित्र रिश्ता या टेलिव्हिजन मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडेनं नुकतंच हळदी कुंकू साजरं केलं आहे.
लग्नानंतरची अंकिताची ही दुसरी मकरसंक्रांत आणि हळदीकुंकू आहे.
पहिल्या वर्षी लग्नानंतर अंकिताच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला हळदी कुंकू करता आलं नव्हतं.
मराठमोळी काळी नऊवारी साडी, हलव्याचे दागिने घालून अंकिता सुंदर नटली होती.
अंकिताच्या हळदी कुंकवाच्या निमित्तानं 14 वर्षांनी पवित्र रिश्ताची स्टारकास्ट पुन्हा एकत्र पाहायला मिळाली.
अंकिता लग्न करून जैन यांच्या घरच्या सून झाली असली तरी लोखंडेंच्या घरच्या अस्सल मराठमोळ्या प्रथा परंपरा ती प्रामुख्यानं जपतानं दिसतेय.
अंकितानं हळदी कुंकवाला आलेल्या प्रत्येकीला बसवून त्यांना स्वत:च्या हातानं हळदी कुंकवाचा मान दिला. अंकिताला हळदी कुंकू लावताना पाहून चाहत्यांनी तिनं कौतुक केलंय.