JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / गर्भवती युवा वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृत्यू, 5 दिवसांआधीच गमावलं होतं 7 महिन्याचं बाळ

गर्भवती युवा वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृत्यू, 5 दिवसांआधीच गमावलं होतं 7 महिन्याचं बाळ

महिला 7 महिन्यांची गर्भवती होती. 5 दिवस आधीच तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता त्यानंतर महिलेचाही मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 21 सप्टेंबर : कोरोनाच्या काळात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत असताना मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका तरुण गर्भवती डॉक्टर महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे महिला 7 महिन्यांची गर्भवती होती. 5 दिवस आधीच तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता त्यानंतर महिलेचाही मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती इथल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात पॅथॉलॉजी विभागात कार्यरत युवा गर्भवती डॉक्टर महिलेचा आज मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अमरावती इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पॅथॉलॉजी विभागात युवा डॉ प्रतिक्षा वालदेकर (MBBS,MD) या कार्यरत होत्या. त्या 7 महिन्याच्या गर्भवती होत्या. मराठा आरक्षणासाठी राज्यातील पहिला जिल्हा आज बंद, टायर पेटवून आंदोलनाला सुरुवात रुग्णालयात सेवा देत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली त्यानंतर त्यांच्यावर अमरावती व नंतर नागपूर इथं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र आज डॉ. प्रतिक्षा वालदेकर यांचा उपचारा दरम्यान नागपूर इथं रुग्णालयात मृत्यू झाला. 5 दिवसांपूर्वी त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता. VIDEO : …आणि अक्षरश: चिमुकल्यानं दिली मृत्यूला हुल; 100 लोक अडकले पण तो वाचला एका युवा डॉक्टरचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात आरोग्य सेवेच्या तुडवड्यामुळे रुग्णांचा नाहक बळी जात आहे. राज्यात रविवारी कोविड रुग्ण बरे होण्याचा विक्रम झाला. दिवसभरात तब्बल 26 हजार 408 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. सलग चौथ्या दिवशी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक झालं आहे. 8 दिवसात बरे झालेल्या रुग्णाची टक्केवारी 70 वरून 73वर गेली आहे. आत्तापर्यंत 8 लाख 84 हजार 384 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 20 हजार 598 नवे रुग्ण सापडले. तर 455 रुग्णांचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या