JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / VIDEO: दिवे लावण्याऐवजी तोंडातून काढले आगीचे लोळ, नंतर चेहऱ्यालाच लागली आग

VIDEO: दिवे लावण्याऐवजी तोंडातून काढले आगीचे लोळ, नंतर चेहऱ्यालाच लागली आग

काही अतिउत्साही लोकांनी भलताच शहाणपणा दाखवला. दिवे लावण्याऐवजी एका तरुणाने तोंडात रॉकेल धरून आगीचे गोळे काढले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उज्जैन, 06 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनतेला 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे लावत एकतेचं प्रदर्शन करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला सर्व देशातून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, काही अतिउत्साही लोकांनी भलताच शहाणपणा दाखवला. दिवे लावण्याऐवजी एका तरुणाने तोंडात रॉकेल धरून आगीचे गोळे काढले. पण त्याचा हा अतिशाहणपणा त्याला इतका नडला की त्याला आयुष्यभर लक्षात राहिन. रविवारी रात्री एक तरुण तोंडातून आगीचे लोळ काढत कलाबाजी करीत होता. पण यावेळी अचानक त्याच्या चेह्यावर आग लागली. ही घटना पाहून शेजारच्या लोकांनी धाव घेतली आणि त्या युवकाला वाचवलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ही घटना उजैनमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील रहिवासी रात्री नऊ वाजता दीप प्रज्वलित करीत होते. यावेळी गाबी हनुमान मंदिराजवळ राहणारा एक तरुण रस्त्यावर आला आणि त्यांनी कलाबाजी केली. आधी त्याने तोंडात ज्वलनशील पदार्थ घेतले आणि नंतर त्यातून आगीचे लोळ बाहेर काढण्याची कलाबाजी दर्शवू लागली. यावेळी, त्याच्या चेह्यावर आग लागली. ही घटना पाहून लोकांमध्ये खळबळ उडाली. पाणी घालून रहिवाशांनी त्याचा बचाव केला. पण या प्रकरणाची माहिती पोलीस किंवा रुग्णालयात पोहोचली नाही.

संबंधित बातम्या

तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन असेल सोमवारपासून तीन दिवस उज्जैन शहर पूर्णपणे बंद असेल. कोणतीही दुकाने उघडणार नाहीत. तेथे फक्त आवश्यक वस्तूंची होम डिलीव्हरी होईल. किराणा सामान आणि इतर दुकाने पूर्णपणे बंद ठेवली जातील. देशामध्ये कलम 144 अन्वये कर्फ्यू जारी करण्यात आल्या असून उज्जैन नगरपालिका हद्दीत राहणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या घरात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जारी केलेल्या आदेशानुसार किराणा, फळे, भाज्या, दूध, डेअरी आणि एलपीजी एजन्सीची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. या वस्तूंची होम एक्सेस सर्व्हिस सुरू राहील आणि ते रात्री 8:00 वाजेपर्यंत दररोज ऑपरेट करू शकतील. प्रत्येक सेक्टरसाठी निवडलेली औषधांची दुकाने दिवसाचे 24 तास खुली असतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या