भोपाळ, 11 जून : देशात कोरोनामुळे गेले कित्येक दिवस देश लॉकडाऊन आहे. अशात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात दारुविक्री सुरू करण्यात आली. अशात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. भोपाळ जिल्ह्यामध्येही 78 दिवसांनंतर बंद असलेली दारूची 90 दुकानं सुरू करण्यात आली. सर्व दुकानं उत्पादन शुल्क विभागामार्फत चालवली जातात. यामध्ये महिला अधिकाऱ्यांकडून दारू विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महिला अधिकारी दारू विक्री करून शहरासाठी महसूल जमा करण्यात गुंतल्या आहे. महिला कॉन्स्टेबल दारू विक्री करण्यास सांगितलं असून महिला नायब तहसीलदारांना महसूल गोळा करण्यासाठी आणि तो बँकेत जमा करण्यासाठी तैनात करण्यात आलं आहे. त्यासाठी ड्युटी चार्टसुद्धा तयार करण्यात आला आहे. या अजब प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
इथे दारूची दुकानं सुरू होताच मद्यप्रेमींनी भल्या मोठ्या रांगा लावल्या. तर 2020-21 वर्षातील नव्या दरांनी दारूची विक्री सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. खूप दिवसांनी दारूची दुकानं उघडल्यामुळे दारूसाठा देखील कमी होता. तर लॉकडाऊनमध्ये अवैध दारूविक्री होत असल्याच्याही अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. इतकंच काय तर आपली आवडती दारू मिळाली नाही म्हणून मद्यप्रेमींनी मिळेत ती दारू खरेदी केली. संपादन - रेणुका धायबर