शिर्डी 11 एप्रिल : किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनांना ग्रामीण भागात हजारोंनी जनसमुदाय जमतो. त्यांच्या दोन वर्षांच्या तारखा बुक आहेत असंही म्हटलं जातं. अलिकडे ते त्यांच्या वक्तव्यांनी वादातही सापडले होते. मात्र इंदुरीकरांची क्रेझ काही कमी झाली नाही. गेली अनेक वर्ष कीर्तन आणि प्रवास हीच त्यांची दिनचर्या झाली होती. मात्र लॉकडाऊनमुळे आता सगळच बदललं असून ते महाराजांनी चक्क बैलगाडी काढून शेतात कामाला सुरूवातही केली आहे. दररोज तीन चार ठिकाणी किर्तनात मग्न असणार्या इंदुरीकर महाराजांना अनेक वर्षानंतर अशा प्रकारे रिकामा वेळ मिळालाय. त्यामुळे दररोज सध्या ते आपल्याकडील बैलगाडीला बैल जुंपतात आणी शेतीच्या कामासाठी स्वतः बैलगाडी हाकत शेततात जातात. शेतातली कामात ते स्वतः मदत करतात. महिलांबद्दल त्यांनी केेलेल्या वक्तव्यामुळे वाद झाला होता. त्यानंतर त्यांनी वादामुळे कीर्तनसोडून शेती करण्याचा विचार बोलून दाखवला होता. आता लॉकडाऊनमुळे खरच त्यांना शेतीत रमावं लागत आहे. सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना प्रत्येकजण करतोय कोरोनापासून दुर राहण्यासाठी एकमेकांपासून दूर राहण्याची वेळ सध्या आलीय. इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाला हजारोंची लोकांची गर्दी होत असते. ती टाळण्यासाठी महाराजांनी लॉकडाऊनच्या आधीच आपले किर्तन बंद करून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पुढाकार घेतला होता. आताही ते लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करत असून स्वतःही शेताच्या कामात रमले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लॉकडाऊन पुढे 30 एप्रिलपर्यंत वाढवावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने लॉकडाऊन उठवण्याची चिंता व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसमवेत चिंता व्यक्त केली. यावर आवर घालण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत वाढावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसचा देशात वेगानं वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी आज पुन्हा मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. मात्र राज्यातील स्थितीवरही प्रत्येक राज्य पंतप्रधानांसोबत चर्चा करून निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण लॉकडाऊन वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तयार असल्याचं सांगण्यात येत आहेत.