नवी दिल्ली,ता.26 जून : विविध बँकांचे 9 हजार कोटी रूपये बुडवून फरार झालेला कर्जबुडव्या विजय मल्ल्याने पत्र लिहून आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. राजकारणाचं आपल्याला शिकार बनवण्यात आलं. मी कर्ज फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असं अजब युक्तीवादही विजय मल्ल्या याने पत्र लिहून केला आहे. दोन वर्ष शांत राहिल्यानंतर पहिल्यांदाच माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचं विजय मल्ल्यानं ट्विट करून स्पष्ट केलं. 15 एप्रिल 2016 ला पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना पत्र लिहून मी माझी बाजू सांगितली पण त्यांच्याकडून कुठलच उत्तर मिळालं नाही. किंगफिशरने 9 हजार कोटींचं कर्ज घेऊन बुडवलं अशी माहिती बँकांनी जाणीवपूर्वक पसरवली आणि मला डिफॉल्टर घोषीत केलं. केवळ राजकारणासाठी या मुद्याचा वापर करून बँकांनी मला कर्जबुडवल्या प्रकरणी पोस्टर बॉय घोषित केलं. महाराष्ट्र बँक बंद करण्याचा सरकारचा डाव - राज ठाकरे निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी प्लास्टिक बंदी- राज ठाकरे बँकांनी माझ्या विविध कंपन्यांची आणि नातेवाईंकांच्या कंपन्यांची 13 हजार कोटींची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. ही चुकीची कारवाई असल्याचं सांगण्याचा प्रयत्नही मल्ल्याने आपल्या पाच पानी पत्रात केला आहे. भारतातून पळून जावून विजय मल्ल्याने सध्या ब्रिटनमध्ये आश्रय घेतला आहे. तर भारतानं मल्ल्याच्या प्रत्यापर्णासाठी ब्रिटनच्या न्यायालयात खटला दाखल केला असून त्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. मल्ल्याला भारतात आणण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत असले तरी ब्रिटनचं कोर्टा काय निर्णय देतं यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अमिताभ आणि माझ्या यशामागे अनेक स्त्रिया-शत्रुघ्न सिन्हा
भारतातले तुरूंग चांगल्या स्थितीत नाहीत असं ब्रिटनच्या कोर्टानं सुनावणीदरम्यान म्हटलं होतं. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यासारख्या नेत्यांना ब्रिटनने याच तुरूंगात ठेवलं होतं. त्यामुळं ब्रिटनला यावर बोलण्याचा अधिकार नाही असं उत्तर भारताने दिलं होतं.