JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'बॉडी स्प्रे'च्या वासामुळे अल्पवयीन मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू?

'बॉडी स्प्रे'च्या वासामुळे अल्पवयीन मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू?

डिओडरंटबाबतची एक धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा नुकताच मृत्यू झाला. तिच्या हातात बॉडी स्प्रे (Body Spray) कॅन होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऑस्ट्रेलिया, 10 मे: गेल्या काही वर्षात डिओडरंट (Deodorant) अर्थात दुर्गंधीनाशक आणि परफ्युम्सचा वापर वाढला आहे. प्रामुख्याने तरुणाई या गोष्टींचा वापर सर्वाधिक प्रमाणात करते. डिओडरंट हे रसायनांपासून (Chemical) बनवलेलं असल्याने त्याचा अतिवापर शरीरासाठी अपायकारक ठरू शकतो. डिओडरंटबाबतची एक धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा नुकताच मृत्यू झाला. तिच्या हातात बॉडी स्प्रे (Body Spray) कॅन होता. या बॉडी स्प्रेमधल्या एरोसोलच्या (Aerosol) वासामुळे तिचा मृत्यू (Death) झाला असावा, असं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर मृत मुलीची आई याबाबत जनजागृती करत आहे. `आज तक`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. ऑस्ट्रेलियात (Australia) 3 फेब्रुवारीला ही घटना घडली. न्यू साउथ वेल्समधल्या अ‍ॅनी या महिलेला राहत्या घरात तिची मुलगी ब्रुक रयानचा (वय 16) मृतदेह जमिनीवर पालथ्या स्थितीत पडलेला आढळला. त्या वेळी मृतदेहाशेजारी डिओडरंट आणि एक टी-टॉवेलही होता. एरोसोलचा वास घेतल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. या जीवघेण्या प्रकाराला `क्रोमिंग` असं म्हणतात, असं सांगितलं जात आहे. Instagram डिलीट करायचं आहे? आधी ही प्रोसेस कराच    `ब्रुक ही एक प्रतिभावान अ‍ॅथलीट होती. तिला वकील, फिजिओथेरपिस्ट किंवा ब्युटीशियन व्हायचं होतं,` असं तिची आई अ‍ॅनी हिनं सांगितलं. या घटनेमुळं अ‍ॅनीला जबर मानसिक धक्का बसला आहे. पालक आणि तरुणांमध्ये इनहेलेंट्सच्या धोक्याविषयी जागृती व्हावी, तसंच डिओडरंटच्या कॅनवर एरोसोलच्या वासाच्या जोखमीबद्दल माहिती दिली जावी, अशी अ‍ॅनीची इच्छा आहे. त्या दृष्टीने ती प्रयत्नशील आहे. आपल्या मुलीचा मृत्यू सडन स्निफिंग डेथ सिंड्रोममुळे (Sudden sniffing death syndrome) झाला, असं अ‍ॅनीला वाटत आहे; मात्र या प्रकरणाचा तपास अहवाल अद्याप आलेला नाही. आपल्या मुलीला कोरोना महामारीच्या काळात चिंतेची (Anxiety) समस्या जाणवू लागली होती. यातून बाहेर पडण्यासाठी ती खूप प्रयत्न करत होती,` असंही अ‍ॅनीने सांगितलं. एरोसोल स्प्रे किंवा सॉल्व्हंट्समधल्या रसायनांचा जास्त काळ वास घेतला, तर हृदयाशी (Heart) संबंधित समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे प्रसंगी मृत्यूदेखील होऊ शकतो. जास्त प्रमाणात रसायनांचा वास घेतल्यास गुदमरल्यासारखं होऊन संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. मोठ्या प्रमाणात रसायनांचा वास घेतल्यानंतर श्वसनाद्वारे ऑक्सिजन शरीरात जात नाही, त्यामुळे अशी दुर्घटना घडते, असं युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरच्या एका अहवालात म्हटलं आहे. हा जीवघेणा ट्रेंड पाहता, डिओडरंट कॅनच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी एका ऑस्ट्रेलियन शिक्षिकेनं केली होती. त्यामुळे अ‍ॅनी रयानने याविषयी लोकांना इशारा देऊन जनजागृती सुरू केली आहे. अजबच आहे! चोराने आधी मालकाच्या घरासमोरील गवत कापलं, मगच पळवून नेलं मशीन   आपल्या मुलीच्या मृत्यूविषयी सिडनी मॉर्निंग हेरॉल्डशी बोलताना अ‍ॅनीने सांगितलं, `जेव्हा मला झोपेतून जाग येते, तेव्हा मी तिच्याविषयी विचार करू लागते. जेव्हा मी झोपायला जाते, तेव्हादेखील तिचा विचार माझ्या मनात येतो. माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा वाईट स्वप्नासारखा आहे. ती एक सुंदर आणि सुस्वभावी मुलगी होती.'

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या