JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Thank You Coronavirus Helpers Google Doodle : कोरोनाच्या या वीरांना गुगलनेही केला सलाम

Thank You Coronavirus Helpers Google Doodle : कोरोनाच्या या वीरांना गुगलनेही केला सलाम

आतापर्यंत गूगल दररोज वेगवेगळ्या प्रोफेशनच्या लोकांच्या सन्मानार्थ डूडल बनवत होता, आज गुगलने एकत्रितपणे डूडल बनवून या सर्व लोकांचा गौरव केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 एप्रिल : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये गुगलने देखील सेवा पुरवत असलेल्या कोरोना वॉरियर्सचे आभार मानले आहेत. गुगलने डूडल्सची एक विशेष सीरिज तयार केली आहे, ज्याच्या अंतर्गत ते या साथीच्या रोगात देखील लोकांना मदत करणार्‍या लोकांचा सन्मान करत आहेत. गुगलने पुन्हा एकदा खास डूडल तयार केले आहे. आतापर्यंत गूगल दररोज वेगवेगळ्या प्रोफेशनच्या लोकांच्या सन्मानार्थ डूडल बनवत होता, आज गुगलने एकत्रितपणे डूडल बनवून या सर्व लोकांचा गौरव केला आहे. या विशेष डूडलमध्ये गुगलने अन्न कामगार, पॅकिंग आणि शिपिंग कामगार, सार्वजनिक वाहतूकदार, किराणा कामगार, शिक्षक, सफाई कामगारांचे आभार मानले आहेत. गुगलने या सर्व पात्राचे G अक्षरानंतर सगळ्यांची पात्र लिहिली आणि नंतर GLE असं लिहिले आहे.

संबंधित बातम्या

कोरोना विषाणूसंदर्भात Google ने बर्‍याच खास डुडल्स बनवल्या आहेत. यापूर्वी, गुगलने शिक्षक, अन्न सेवा कामगार, लोकांना सामान पुरवित असलेल्या पॅकेजिंग, शिपिंग आणि वितरण कामगारांना आदर दिला होता. या व्यतिरिक्त, कोरोना विषाणूचा सामना करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांच्या वेगवेगळ्या विशेष डुडल्सना थॅन्क्स म्हटलं आहे. यासह डूडलच्या माध्यमातून कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्सही देण्यात आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या