JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पत्रकारांचे ट्विट हटवण्याची मागणी करण्यात भारत आघाडीवर, ट्विटरनेच केला खुलासा

पत्रकारांचे ट्विट हटवण्याची मागणी करण्यात भारत आघाडीवर, ट्विटरनेच केला खुलासा

ट्विट डिलिट करण्याची मागणी करण्यात भारत जगभरात आघाडीवर आहे, असा खुलासा ट्विटर (Twitter) कंपनीनं केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जुलै :  मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट असलेलं ट्विटर (Twitter) हा जगातील प्रसिद्ध सोशल मीडियापैकी एक आहे. दररोज कोट्यवधी लोक आपलं म्हणणं मांडण्यासाठी ट्विटरचा वापर करतात. एखाद्या नेत्याने किंवा सेलिब्रिटने आपल्या हँडलवरून काही ट्विट केल्यास ते अधिकृत (Twitter official handle) समजलं जातं. मात्र, या सगळ्यातच ट्विटरवर कित्येकवेळा अशी ट्विटही प्रसिद्ध होतात जी समाजासाठी घातक ठरतात. अशावेळी कित्येक ट्विट्सवर कंपनी स्वतःच कारवाई करते. तर, काही वेळा एखाद्या देशाचं सरकार ट्विटरला ठराविक ट्विट डिलिट करण्याची मागणी (Request to remove tweet) करतं. अशा प्रकारची मागणी करण्यात भारत सगळ्या देशांमध्ये पुढे (India ahead among countries requesting removal of tweets) असल्याची माहिती ट्विटरने दिली आहे. ‘लाईव्ह हिंदुस्थान’नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ट्विटरने आपल्या रिपोर्टमध्ये (Twitter Report) म्हटलंय, की जुलै ते डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये जगभरातून पत्रकार आणि मीडिया संस्थांशी संबंधित एकूण 349 अकाउंट्सवरील माहिती डिलिट करण्याची मागणी विविध देशांतील सरकारांनी केली होती. हे प्रमाण जानेवारी ते जून 2021 या कालावधीच्या तुलनेत तब्बल 103 टक्क्यांनी अधिक होतं. जुलै ते डिसेंबर या कालावधीत यात भारताकडून सर्वाधिक, 114 मागण्या आल्या होत्या. त्यापाठोपाठ तुर्की (78), रशिया (55) आणि पाकिस्तानचा (48) क्रमांक आहे. तसंच, जानेवारी ते जून यादरम्यानदेखील भारताकडूनच सर्वाधिक मागण्या करण्यात आल्याचं ट्विटरनं म्हटलं आहे. नोकरी बदलताय? मग नोटीस पीरियडबद्दल माहिती हव्यातच ‘या’ गोष्टी… वापरकर्त्यांची माहिती मागण्यात अमेरिका अव्वल ट्विटर युझर्सची माहिती मागवण्यात (Demanding Twitter user information) अमेरिका पहिल्या स्थानावर असल्याचं या रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे. मात्र, भारताचा क्रमांकही दुसरा आहे. यूझर्सची माहिती मागण्यासाठी करण्यात आलेल्या विनंत्यांपैकी 20 टक्के या अमेरिकेने केल्या होत्या, तर 19 टक्के मागण्या भारताने केल्या होत्या. अशी मागणी करणाऱ्या टॉप पाच देशांमध्ये जपान, फ्रान्स आणि जर्मनीचाही समावेश आहे. जुलै ते डिसेंबर 2021 यादरम्यान जगभरातून ट्विटरवरील कंटेंट हटवण्यासाठी 47,572 विनंत्या करण्यात आल्या होत्या. यांपैकी आठ टक्के, म्हणजेच 3,992 विनंत्या भारताने केल्या होत्या असं ट्विटरने स्पष्ट केलं. ट्विटरने स्पष्ट केलं, की या कायदेशीर मागण्यांमध्ये माहिती हटवण्याचे न्यायालयाचे आदेश, आणि इतर औपचारिक विनंत्यांचा समावेश आहे. या मागण्या सरकारी संस्था आणि व्यक्तींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांकडून प्राप्त होतात. कंपनीने सांगितलं, की 2021 च्या दुसऱ्या सहामाहीत जगभरातील अधिकृत पत्रकार आणि माध्यम संस्थांची 17 ट्विट काढून टाकण्यात आली होती, तर पहिल्या सहामाहीत ही संख्या 11 होती. याबाबत अधिक तपशील देण्यात आला नाही. 3,419 कोटी रुपये Electricity Bill पाहून बसला ‘शॉक’, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आली वेळ मोठ्या नेत्याचं ट्विट डिलिट भारतातील राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानेही ट्विटरला एका अल्पवयीन मुलीशी संबंधित ट्विट डिलिट करण्याची विनंती केली होती. ट्विटरने याबाबत कोणाचंही नाव स्पष्ट केलं नसलं, तरी हे प्रकरण राहुल गांधी यांच्याशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. सामूहिक अत्याचाराला बळी पडलेल्या एका दलित मुलीच्या कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. या वेळी त्यांच्यासोबत आपला फोटो त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला होता. यामुळे त्या पीडितेची ओळख जाहीर झाली असती, म्हणून आयोगाने हे ट्विट हटवण्याची मागणी केली होती. ट्विटरने आपल्या रिपोर्टमध्ये कोणाचंही नाव न घेता ‘भारतीय कायद्याचा दाखला देत, एका मोठ्या नेत्याचं ट्विट भारतात प्रतिबंधित करण्यात आलं होतं.’ असा उल्लेख केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या