JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' तील 'या' वादग्रस्त दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' तील 'या' वादग्रस्त दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने चित्रपटाची समीक्षा केली असून, यात अनेक बदल करण्याचा सल्ला निर्मात्यांना दिला आहे.

जाहिरात

रॉकी और रानी की प्रेम कहानी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23  जुलै : सध्या बॉलिवूडच्या एका चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. तो म्हणजे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’. या चित्रपटाद्वारे करण जोहर अनेक वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शनात कमबॅक केलं आहे. तर आलिया भट्ट आणि रणवीर सिंगची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गाणी ऑलरेडी हिट झाली आहेत. तर आलिया आणि रणवीर सध्या भारतभर प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. करण जोहरच्या करिअरला यावर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं हा चित्रपट करण जोहरसाठी खास आहे. त्यामुळे करण जोहरच्या फॅन्सना या चित्रपटाची विशेष उत्सुकता लागून राहिली आहे. पण आता त्याआधी चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’  या फॅमिली ड्रामामध्ये आलिया भट्ट, रणवीर सिंग, जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत आहेत. रिलीजपूर्वी, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने चित्रपटाची समीक्षा केली असून, यात अनेक बदल करण्याचा सल्ला निर्मात्यांना दिला आहे.  तसेच वादग्रस्त शब्दांवर आक्षेप नोंदवत ते शब्द चित्रपटातून हटवण्यात आले आहेत.

एका न्यूज पोर्टलनुसार, चित्रपटात अनेक वेळा वापरण्यात आलेला ‘बी डी’ हा अपमानजनक शब्द ‘बेहेन दी’ ने बदलण्यात आला आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये मद्यपानाच्या उल्लेखात ‘ओल्ड मॉन्क’ शब्द आला होता. याजागी ‘बोल्ड मॉन्क’ शब्द करण्यात आला आहे. दीड वर्षात 3 चित्रपट फ्लॉप, ‘या’ सुपरस्टारमुळं निर्मात्यांचं 410 कोटींचं नुकसान; आता एका सिनेमावर टिकलंय भविष्य तसंच महत्वाचं म्हणजे ‘लोकसभा’ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा उल्लेख असलेला संवाद कापला गेला आहे. रिपोर्टनुसार,  या दृश्यातील महिलांविषयीचा अपमानास्पद शब्द काढून टाकण्यात आला आहे. याच सीनमध्ये ‘ब्रा’ या शब्दाऐवजी आयटम हा शब्द वापरण्यास सांगितले आहे. बुधवारी सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा 2 तास 48 मिनिटांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील एका सीनमध्ये नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. ट्रेलरमध्ये हा सीन पाहायला मिळाला. या सीनमध्ये रॉकी 3 महिन्यांसाठी रानी च्या घरी जातो. तेव्हा त्याचे लक्ष रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे फोटोकडे जाते आणि तो त्यांना रानीचे आजोबा म्हणून त्यांचा पाया पडतं असतो. हा सीन विनोदी शैलीतून दाखवण्यात आला आहे. हेच नेटकऱ्यांना खटकलं. त्यावरून नेटकऱ्यांनी करण जोहरला सुनावलं होतं. आता या सिन मध्ये देखील बदल करण्यात येणार असून या जागी फिल्टर टाकण्यात येणार आहे. तसेच रविंद्रनाथ टागोर यांचा उल्लेख चित्रपटातून हटवण्यात आला आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ 28 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सगळ्यांनाच हा चित्रपट सुपरहिट होईल अशी आशा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या