JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / चीनशी झालेल्या तणावावर आज राज्यसभेला संबोधित करणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

चीनशी झालेल्या तणावावर आज राज्यसभेला संबोधित करणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री दुपारी 12 वाजता भारत-चीन मुद्द्यावर नियंत्रण रेषेवरीn तणावाविरोधात भाष्य करतील अशी माहिती देण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) हे पूर्व लडाखमध्ये (Northern Ladakh) सुरू असलेल्या चीनसोबतच्या (China) गतिरोधावरिधात आज गुरुवारी राज्यसभेमध्ये (Rajyasabha) भाष्य करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्र्यांच्या विधानानंतर विरोधी नेते आपलं म्हणणं मांडतील आणि आवश्यकता पडल्यास सिंह सभापतीच्या परवाणगीने त्यावर स्पष्टीकरण देती. तर संरक्षण मंत्री दुपारी 12 वाजता भारत-चीन मुद्द्यावर नियंत्रण रेषेवरीn तणावाविरोधात भाष्य करतील अशी माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर विरोधक आपली भूमिका मांडू शकतात. तर गरज असल्यास संरक्षण मंत्रीदेखील यावर स्पष्टीकरण देऊ शकतात. मंगळवारीच सिंह यांनी लोकसभेमध्ये यांसंबधी विधानं केली होती. त्यावेळी ते म्हणाले की, तिथे आम्ही आव्हानांचा सामना करत आहे. देशाच्या सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करण्यासाठी आमचं सशस्त्र सैन्य ठाम उभं आहे. पूर्व लद्दाखच्या परिस्थितीबाबत लोकसभेत दिलेल्या निवेदनात संरक्षण मंत्र्यांनी असंही म्हटलं आहे की, ‘संबंधित प्रस्तावाला या सभागृहाने आणि संपूर्ण देशाने सार्वभौमत्वासाठी आणि प्रादेशिक अखंडतेसाठी ठामपणे उभं राहायला हवं’ ‘शांततेत तोडगा हवा आहे’ या सगळ्यावर बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, चीनच्या सीमेवरील गतिरोध सोडवण्यासाठी भारत हा कटिबद्ध आहे. जबरदस्तीने सीमा बदलण्याचा प्रयत्न मान्य नसल्याची माहिती भारताने आधीच चीनला दिली आहे. त्यामुळे भारत सीमाप्रश्न शांततापूर्ण संवाद आणि सल्लामसलत करून सोडवण्यास वचनबद्ध आहे. या उद्देशाने मी 4 सप्टेंबर रोजी चीनच्या संरक्षणमंत्र्यांशी बोललो. " तर आम्हाला हा प्रश्न शांततेत सोडवायचा आहे आणि चीनशी एकत्र येत काम करायचं आहे असंही ते यावेळी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या