इस्लामाबाद, 30 मार्च : पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे वरिष्ठ नेते फैसल वावडा यांनी दावा केला आहे की पंतप्रधान (पीएम) इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचला जात असल्यानं त्यांच्या जीवाला धोका आहे, एआरवाय न्यूजनं बुधवारी वृत्त दिलं. एआरवाय न्यूजशी “ऑफ द रेकॉर्ड” कार्यक्रमात बोलताना फैसल वावडा म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या करण्याची योजना होती. फैसल वावडा म्हणाले की पंतप्रधान इम्रान खान यांना सार्वजनिक मेळाव्याला संबोधित करताना बुलेटप्रूफ जॅकेट वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु, पंतप्रधान म्हणाले की, ‘ते सर्वशक्तिमान अल्लाहने निश्चित केलेल्या वेळी हे जग सोडून जातील.’ पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे नेते म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान धाडसी आहेत, ते देशाला पणाला लावणार नाहीत आणि देशाला कोणाच्याही पुढे झुकू देणार नाहीत. हे वाचा - Imran Khanची पत्नी जाळतेय जिवंत कोंबडे, आता काय भूत आणि काळी जादू सरकार वाचवणार? देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत पंतप्रधान इम्रान खान यांची स्पष्ट भूमिका आहे आणि आता पाकिस्तान कोणाच्याही युद्धाचा भाग बनणार नाही, असं फैसल वावडा म्हणाले. आमच्या शेजारी देशांवर हल्ला करण्यासाठी देशाचे हवाई तळ कोणालाही दिले जाणार नाहीत, असंही ते म्हणाले. जे देशाचे नेतृत्व करत आहेत, ते लोकांची संपत्ती आहेत. परंतु, दुर्दैवानं पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण भूतकाळात परदेशी धन्यांच्या आदेशानुसार बदललं गेलं, असं ते म्हणाले.