JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पाकिस्तानमध्ये महिला पत्रकाराची घरात घुसून हत्या, 5 गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू

पाकिस्तानमध्ये महिला पत्रकाराची घरात घुसून हत्या, 5 गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू

नवी दिल्ली, 06 सप्टेंबर : पाकिस्तानमध्ये शनिवारी एका महिला पत्रकाराला गोळ्या घालून जीवे मारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शाहीना शाहीन असं सरकारी टीव्ही चॅनलमध्ये काम करणाऱ्या महिला पत्रकाराचं नाव होतं. शाहीना ही पाकिस्तान टीव्हीवर अँकर आणि रिपोर्टर होती. काही दिवसांपूर्वीच तिची बलूचिस्तानमधील तुर्बत इथं बदली करण्यात आली होती. शाहीना ही पहिली नाही तर याआधीही गेल्या वर्षी उरुज इक्बाल नावाच्या एका महिला पत्रकाराला गोळ्या झाडून ठार मारण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, 1992 पासून पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 61 पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 सप्टेंबर : पाकिस्तानमध्ये शनिवारी एका महिला पत्रकाराला गोळ्या घालून जीवे मारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शाहीना शाहीन असं सरकारी टीव्ही चॅनलमध्ये काम करणाऱ्या महिला पत्रकाराचं नाव होतं. शाहीना ही पाकिस्तान टीव्हीवर अँकर आणि रिपोर्टर होती. काही दिवसांपूर्वीच तिची बलूचिस्तानमधील तुर्बत इथं बदली करण्यात आली होती. शाहीना ही पहिली नाही तर याआधीही गेल्या वर्षी उरुज इक्बाल नावाच्या एका महिला पत्रकाराला गोळ्या झाडून ठार मारण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, 1992 पासून पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 61 पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. तर सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे याच आठवड्यात एका मुलाखतीत पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानमधील पत्रकारांना सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर अशी घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुण पत्रकार होती शाहीना शाहीनाने यापूर्वी इस्लामाबादमधील एका खासगी टीव्ही वाहिनीवर काम केलं होतं. यानंतर ती एका सरकारी टीव्ही चॅनेलमध्ये नोकरीला लागली. काही महिने इस्लामाबादमध्ये थांबल्यानंतर शाहीनाची तूरबत इथल्या बलुचिस्तानमध्ये बदली करण्यात आली. इथं ती एका स्थानिक मासिकाची संपादकही असल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबारानंतर आरोपी फरार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहनाची तिच्या राहत्या घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर होते. ते तिच्या घरी गेले आणि दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच आरोपींनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. शाहीनाला 5 गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर काही अज्ञात व्यक्तींने शाहीनाला तातडीने कारमध्ये रुग्णालयात नेलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलीस या घटनेचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. शाहीनाच्या कुटुंबीयांनी काही लोकांवर गुन्हा दाखल केला असून यामध्ये शाहीनाच्या नवऱ्याचंही नाव असल्याची माहिती समोर येत आहे. 5 महिन्यांपूर्वी शाहीनाचे लग्न झालं होतं. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या