कोलकाता, 01 मे : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) नाश करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. औषधांचा शोध सुरू आहे, लसीच्या चाचण्या होत आहेत. त्यात आता भारतातील शास्त्रज्ञांनी नॅनोमेडिसीनने (Nanomedicine) कोरोनावर उपचार होऊ शकतात असा दावा केला आहे. कोलकात्यातील (Kolkata) शास्त्रज्ञांनी नॅनोमेडिसीनचा प्रयोग करून पाहिला. सुभाषचंद्र बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस कोलकाता (एसएनबीएनसीबीएस) च्या शास्त्रज्ञांना सुरक्षित आणि प्रभावी अशी नॅनोमेडिसीन बनवण्यात यश मिळालं आहे आणि या नॅनोमेडिसीनची कोरोनाव्हायरसवर उपचारांसाठी मदत होऊ शकते, असं ते म्हणालेत. द इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे. कशी काम करते नॅनोमेडिसीन? नॅनोमेडिसीन शरीरातील ऑक्सिडेटेव्ह स्ट्रेस बदलून कित्येक आजारांवर उपचार करण्यात सक्षम असते. नॅनोमेडिसीन शरीरात रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज (रेडॉक्स) घटवू आणि वाढवू शकते. तज्ज्ञांच्या मते, पेशींमध्ये रेडॉक्स प्रतिक्रिया ऑक्सिजन वाढवतात किंवा घटवतात. हे वाचा - Coronavirus वर मात करणारी देशातील ‘ती’ पहिली कोरोना रुग्ण सध्या काय करतेय? ज्यामुळे कित्येक प्रक्रियांसाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेची पेशींमध्ये निर्मिती होते. याचा प्रयोग व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी केलं जातं. हे औषध तयार करण्यासाठी लिंबूतील अर्क आणि मॅगनीज साल्टचे नॅनोपार्टिकल्स वापरले आहेत. उंदरांवर करण्यात आलं परीक्षण नॅनोमेडिसीनचा उंदरावर प्रयोग करण्यात आला. नॅनोमेडिसीनमुळे सुरक्षित पद्धतीने अडीच तासांत बिलीरुबिन (Bilirubin) ची पातळी खाली आली. उंदरावर औषधाच्या यशस्वी प्रयोगानंतर आता माणसांवर त्याचा प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे. काविळीप्रमाणे इतर आजारांवर हे औषध फायदेशीर ठरू शकतं. शिवाय कोरोनाव्हायरसच्या दृष्टीनेदेखील हे नॅनोमेडिसीन विकसित करता येऊ शकतं, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - लक्षण दिसण्याआधीच Cancer चं निदान करणार फक्त एक ब्लड टेस्ट, शास्त्रज्ञांचा दावा