JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मुंबईत टँकर आणि पल्सरचा भीषण अपघात, आगीत होरपळल्याने तरुणाने जागीच सोडला जीव

मुंबईत टँकर आणि पल्सरचा भीषण अपघात, आगीत होरपळल्याने तरुणाने जागीच सोडला जीव

केमिकल टँकरचा धोका लक्षात घेत आजूबाजूची गावं खाली केली व महामार्गावरील वाहतूक थांबवत मोठा अनर्थ टाळला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 जून : मुंबईत विरार इथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. विरार पूर्वेकडील मुंबई अहमदाबाद महामार्गवर शिरसाड फाटा इथे पल्सर आणि टँकरची धडक झाली. केमिकलचा टँकर असल्याने धडक होताचा मोठा स्फोट होऊन आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव पल्सर मोटारसायकल चालकाने केमिकल टँकरला मागून धडक दिली. त्यात केमिकल टँकरला भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की पल्सर चालक काही वेळात जळून खाक झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघाताची माहिती विरार पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. केमिकल टँकरचा धोका लक्षात घेत आजूबाजूची गावं खाली केली व महामार्गावरील वाहतूक थांबवत मोठा अनर्थ टाळला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरने पेट घेताचा आगीचे मोठे लोळ परिसरात पसरसण्यात सुरुवात झाली. यामध्ये दुचाकीस्वाराला जीव वाचवण्यासाठी पळण्याची संधीदेखील मिळाली नाही आणि आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आगीतून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर आगीत पूर्ण शरीर जळाल्यामुळे मृताची ओळख पटवण्यास अडचण होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर घटनास्थळी टँकर बाजूला करण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या