नवी दिल्ली,ता.17 जुलै : हिमा दासने IAAF च्या २० वर्षांखालील अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देशाची मान उंचावली. 400 मीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत हिमा अव्वल ठरली. अशा प्रकारची स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आणि गेल्या कित्येक वर्षांचं देशाचं स्वप्न पूर्ण झालं. या स्पर्धेच्या आधी कुणालाही हिमा दासचं नाव माहित नव्हतं. या विजयानंतर आसामच्या एका छोट्या खेड्यातल्या या सुवर्णकन्येचं नाव सर्वांना माहित झालं. सोशल मीडियावरही हिमाचं जोरदार कौतुक झालं पंतप्रधानांपासून ते सामान्य क्रीडाप्रेमी नागरिकांपर्यंत प्रत्येकाने तीला शुभेच्छा दिल्या. ही एक बाजू असताना दुसरी बाजू संताप आणणारी आहे. याच काळात गुगलवर हिमा दास हिची ‘जात’ शोधली गेली अशीही माहिती समोर आली आहे. टेक्नॉलॉजिच्या कितीही गप्पा मारल्या तरी लोक ‘जात’ सोडायला तयार नसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. हिमा दास असं नाव गुगलवर टाईप केलं तर लगेच दुसराच सर्च हिमा दास कास्ट असता येतो. गुगलवर जे शब्द जास्त सर्व केले जातात त्याचा हा ट्रेण्ड असतो. अनेक नेटकऱ्यांनीही ट्विटरवर ही गोष्ट लक्षात आणून देत ट्विट केलं. त्यामुळं जातीपातीच्या आपण केव्हा पुढं जाणार हा प्रश्न विचारला जावू लागला. सुवर्णपदक मिळाल्यानंतर राष्ट्रगित वाजत असताना हिमाने अश्रुंना वाट मोकळी करून दिली. गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलेलं तीचं स्वप्न पूर्ण झालं होतं. तीच्या त्या अश्रुंनी देशही हेलावला होता. प्रतिकूल परिस्थितीत मेहनत करणाऱ्या हजारो खेळाडूंनी तिच्यात स्वत:ला पाहिलं होतं. मात्र असं असतानाही गुगलचं हे कुटू सत्य आपल्याच समाजाचा एक भाग आहे हेही नाकारून चालणार नाही. ज्या दिवसी समाजातून ही प्रवृत्ती संपेल तो दिवस भारतासाठी सुवर्णदिन ठरेल अशा बोलक्या प्रतिक्रीयाही समाजमाध्यमांमधून व्यक्त झाल्या. हेही वाचा…