चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने का होतात वाद? ही आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य

पण राजकारणाच्या पाण्याची तऱ्हाच काही वेगळी असते. अमित शहांच्या खास विश्वासातले दादा मंत्रिमंडळात आले आणि क्रमांक दोनचे मंत्रीही बनले आणि आपणही कसलेले राजकारणी आहोत हे दादांनी दाखवून दिलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2018 07:05 PM IST

चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने का होतात वाद? ही आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य

मुंबई,ता.17 जुलै : चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले क्रमांक दोनचे मंत्री. मितभाषी, कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारे. आयुष्याचा मोठा काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि विद्यार्थी परिषदेत गेलेला. त्यामुळं राजकारण्यांची गेंड्यांची कातडी दादांना कधी आली नव्हती. दादा प्रकाशझोतात आले तेव्हा ते राजकारणात कसे फिट बसतील? असा प्रश्न विचारला जावू लागला. नैतिकता वगैरे गोष्टी इतर संघटनेत ठिक असतात राजकारणात त्याचं काही चालत नाही हे दादांना त्यावेळी ऐकवलं जावू लागलं. आपल्या वक्तव्यांमुळं वाद झाला तर त्याचा विपर्यास केला गेला, आपण असे बोललोच नाही, विरोधकांचा कट होता ही खास राजकारण्यांची स्टाईल दादांना तोपर्यंत माहित नव्हती.

पण राजकारणाच्या पाण्याची तऱ्हाच काही वेगळी असते. अमित शहांच्या खास विश्वासातले दादा मंत्रिमंडळात आले आणि क्रमांक दोनचे मंत्रीही बनले आणि आपणही कसलेले राजकारणी आहोत हे दादांनी दाखवून दिलं.

'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते बेभान, ट्रकचालकासह ट्रक पेटवला

जखमींची विचारपूस करताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी

पार्टी विथ डिफरन्स असं भाजपचे नेते म्हणतात पण भाजप हे काही भजनी मंडळ नाही हे दादांनी मोकळेपणाने सांगून टाकलं. मराठा आरक्षणाचा विषय असो की खड्ड्यांचा, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आयारामांचा की दुधाच्या आंदोलनाचा दादांच्या वक्तव्यांनी अनेकदा वाद निर्माण केले. पण दादांचा दबदबा मोठा असल्याने परिस्थिती हाताबाहेर कधी गेली नाही आणि दादांनीही मनाचा मोठेपणा दाखवत दिलगीरी व्यक्त करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Loading...

दमदार पावसाने उडवली पुणेकरांची दाणादाण!

जखमींची विचारपूस करताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी

दादांची 'दादागिरी' दाखवणारी वक्तव्य -

  • मुंबईचे दूध बंद करायला ती काय पाकिस्तानात आहे का ?

  • ज्या रस्त्यावर ५ लोकांचा बळी गेला त्याच रस्त्यावरून ५ लाख लोकांनी प्रवास केला. मग सगळाच दोष सरकारला कसा देता येईल? रस्त्यांची जबाबदारी ही महापालिकेचीही आहे.

  • भाजपा भजनी मंडळ नसून एक राजकीय पक्ष आहे. त्यामुळे अन्य पक्षाचे गुणदोषही असणारच. जे इतर पक्ष करतात तेच आम्ही केलं.

  • निवडणुकांमध्ये येत असलेले अपयश, जातीयतेचे न जमणारे गणित यामुळे शरद पवार यांना नैराश्य आले आहे.

  • मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच ते देणे सरकारच्या हाती नाही असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्याच दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती.

  • बेळगावच्या एका कार्यक्रमात कन्नड गाण्यातून कर्नाटकची स्तुती केल्याने बरीच टीका झाली होती.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 06:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...