'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते बेभान, ट्रकचालकासह ट्रक पेटवला

ही घटना मालेगाव इथं घडली. स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी एक ट्रक अडवला आणि ट्रकच्या चाकावर पेट्रोल ओतून पेटवून दिला

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2018 05:35 PM IST

'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते बेभान, ट्रकचालकासह ट्रक पेटवला

मालेगाव,16 जुलै : राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध बंद आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहे. मध्यरात्रीपासून दुधाचे ट्रक अडवायला सुरूवात झाली. मात्र, या आंदोलनाचा भयावह चेहरासमोर आलाय. ट्रकमध्ये चालक आतमध्ये असतानाही ट्रक पेटवून देण्याचा प्रकार घडलाय. कार्यकर्त्यांना एवढंही भान नव्हतं की त्यांनी ट्रकचालकाच्या जीवाची परवा केली नाही. सुदैवाने ट्रकचालकानेच ट्रकमधून उडी मारून स्वत:चा जीव वाचवला.

ही घटना मालेगाव इथं घडली. स्वाभिमानीचे कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी एक ट्रक अडवला आणि ट्रकच्या चाकावर पेट्रोल ओतून पेटवून दिला. पण तोपर्यंत ट्रकचालक हा ट्रकमध्येच होता. कार्यकर्ते एवढ्यावर थांबले नाही त्यांनी ट्रकच्या बोनेटवरही पेट्रोल ओतले आणि पेटवून दिला त्यानंतर एकच आगीचा भडका उडाला आणि त्यामुळे ट्रकचालकाने ट्रकमधून बाहेर उडी टाकली. पण एखाद्याच्या जीवापेक्षाही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना ट्रक पेटवून देणे इतके महत्त्वाचं वाटलं का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थितीत झालाय.

‘स्वाभिमानी’चे दूध आंदोलन पेटले; टँकर जाळण्याचा प्रयत्न!

दरम्यान, केरळ आणि कर्नाटकप्रमाणं महाराष्ट्रातही दुधाला लिटरमागे 5 रु. अनुदान द्यावं, अशी प्रमुख मागणी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडवतायेत. आंदोलन करणं हा प्रत्येकाचा हक्का आहे, पण ते करताना अनेक ठिकाणी शेकडो लिटर दूध वाया जातंय, कारण टँकरचे व्हॉल्व सोडण्यात येतायेत, तर कुठे दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकण्यात येतायेत.

नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला, 20 जण जखमी

Loading...

तर दूध आंदोलनावर वारणा दूध संघाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी प्रतिक्रिया देताना मुंबईतील ग्राहक दुरावण्याची भीती व्यक्त केलीय. अमूलचा शिरकाव यामुळे वाढणार असून अमूल विरोधात आंदोलन करा आम्हीही रस्त्यावर उतरू असं आवाहन सुद्धा खासदार राजू शेट्टी याना कोरे यांनी केलंय.

दूध आंदोलनाचे विधिमंडळात पडसाद

दुधाचे दर ३ रुपये प्रति लिटरनं वाढवले जाणार आणि दुधाच्या भुकटीला ५० रुपये अनुदान देणार अशी घोषणा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली. पण विरोधक मात्र यावर समाधानी नाहीयेत. सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वासच उरलेला नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. आम्ही दूध उत्पादकांशी चर्चा करायला तयार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

सुप्रिया सुळेंचा दूध आंदोलनाला पाठिंबा

राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिलाय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात दुधाला 28 रुपये भाव होता. भाजप सेनेचे सरकार मात्र केवळ 18 रुपये भाव देतंय.  गुजरातमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जर 300 कोटींचे पॅकेज मिळत असेल तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल करत पिपाणी वाजवत भर पावसात सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...