JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / आमदार श्रीनिवास वनगांनी खलाशांच्या कुटुंबियांना केली शिवीगाळ, सोशल मीडियावर Audio Clip व्हायरल

आमदार श्रीनिवास वनगांनी खलाशांच्या कुटुंबियांना केली शिवीगाळ, सोशल मीडियावर Audio Clip व्हायरल

पालघर, 11 एप्रिल : वेरावळ पोरबंदर मंगळूर इत्यादी भागांमध्ये अडकलेल्या खलाशांना सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले असे विचारणाऱ्या एका तलासरीच्या नागरिकाला पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी अरेरावीपणा करत थेट शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार श्रीनिवास यांचे वडील कैलासवासी चिंतामण वनगा हे या भागातील खलाशांच्या खूप प्रसिद्ध नेते होते. खलासी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी दिवंगत खासदार यांच्याकडे जात असत. गुजरात राज्याच्या पोरबंदर वेरावळ भागात अडकलेल्या खलाशांना महाराष्ट्रात आपण कधी आणणार असे विचारण्यासाठी एका व्यक्तीने कॉल केला असता संभाषणाच्या काही वेळेनंतर आमदार श्रीनिवास यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट समोरच्या व्यक्तीला शिवीगाळ केल्याचं या क्लिपवरून दिसून येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पालघर, 11 एप्रिल : वेरावळ पोरबंदर मंगळूर इत्यादी भागांमध्ये अडकलेल्या खलाशांना सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले असे विचारणाऱ्या एका तलासरीच्या नागरिकाला पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी अरेरावीपणा करत थेट शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार श्रीनिवास यांचे वडील कैलासवासी चिंतामण वनगा हे या भागातील खलाशांच्या खूप प्रसिद्ध नेते होते. खलासी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी दिवंगत खासदार यांच्याकडे जात असत. गुजरात राज्याच्या पोरबंदर वेरावळ भागात अडकलेल्या खलाशांना महाराष्ट्रात आपण कधी आणणार असे विचारण्यासाठी एका व्यक्तीने कॉल केला असता संभाषणाच्या काही वेळेनंतर आमदार श्रीनिवास यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट समोरच्या व्यक्तीला शिवीगाळ केल्याचं या क्लिपवरून दिसून येत आहे. हे वाचा -  पाकला खोड नडली; भारतीय सैन्याने शस्त्रांचा डेपो, लॉन्चिंग पॅड केला उद्ध्वस्त दरम्यान, यासंबंधी श्रीनिवास वनगा यांनी विचारलं असता हा फोन राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी केला असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, व्हिडिओ क्लिपमध्ये शिवीगाळ केली असल्यानुळे ती आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. सदर व्यक्तीने यापूर्वी आपल्याला सलग फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. तसेच ही व्यक्ती खलाशी नसून तलासरी इथे राजकीय हेतूने फोन करण्यात येत होता. अशाप्रकारे वारंवार फोन करण्याचा प्रयत्न करत असल्याने आपला राग अनावर झाल्याचं आमदार वनगा यांनी काही माध्यमांच्या प्रतिनिधींना व्ययक्तिक सांगितलं संकलन, संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या