JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / भीषण अपघात: खाणीत माती खचल्यामुळे 5 जणांचा जागीच मृत्यू, ढिगाऱ्याखाली अडकले डझनभर कामगार

भीषण अपघात: खाणीत माती खचल्यामुळे 5 जणांचा जागीच मृत्यू, ढिगाऱ्याखाली अडकले डझनभर कामगार

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शहडोल (उत्तर प्रदेश), 13 जून : मातीच्या खाणींमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये 6 जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन डझनहून अधिक लोक या खाणीत अडकल्याची माहिती आहे. तात्काळ घटनास्थळावर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. शहडोल जिल्ह्याच्या पपरेडी गावात हा अपघात झाला आहे. हा परिसर ब्यौहारी ठाणा क्षेत्र परिसरात येतो. इथे काही मातीचे ढिगारे खचल्यामुळे तिथे काम करणाऱ्या 5 ग्रामीण लोकांचा मृत्यू झाला आणि काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये 6 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर खाणीमध्ये अजूनही 24 ते 25 कामगार अडकले असल्याचं वृत्त आहे. अचानक खचली खाणीची माती खाणीत मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू होतं. यावेळी ग्रामस्थ व मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशात काम करताना अचानक मातीचा काही भाग खचायला सुरुवात झाली. चिखलामुळे अनेक कामगार बाहेर येऊ शकले नाही. अपघाताच्या ठिकाणी आरडाओरडा झाला. इतर स्थानिक आणि मदतकार्य घटनास्थळी दाखल झालं आहे. धक्कादायक म्हणजे मातीचा ऐवढा मोठा गोळा झाला आहे की त्यात कोण जिवंत आहे की मृत्यू याचीही माहिती मिळणं कठीण झालं आहे. मदत व बचाव कार्य सुरू अपघात घडताच गावकरी आणि स्थानिक मदतीसाठी धावले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील लोक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केलं. मात्र, तोपर्यंत 5 कामगारांचा मृत्यू झाला होता. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर अजूनही 10 लोक खाणीत अडकल्याची बातमी आहे. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या