JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / VIDEO: 'तुम्ही लकी विनर आहात' पोलिसांनी चक्क आरती करून बाहेर हिंडणाऱ्यांना जबर धुतलं

VIDEO: 'तुम्ही लकी विनर आहात' पोलिसांनी चक्क आरती करून बाहेर हिंडणाऱ्यांना जबर धुतलं

विनाकारण लोक घराच्या बाहेर पडून गर्दी करत आहे. अशा अतिशहाण्या लोकांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

27 मार्च : संपूर्ण देशात कोरोनाव्हायरसने हाहाकार माजवला आहे. या रोगाचा फैलाव थांबवण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोणीही 14 एप्रिलपर्यंत घराच्या बाहेर न निघण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देण्यात आले आहेत. असं असतानाही लोकांना या आजाराचं गांभीर्य नाही आहे. विनाकारण लोक घराच्या बाहेर पडून गर्दी करत आहे. अशा अतिशहाण्या लोकांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही पोलिसांनी दिलेले फटके पाहिले आहेत. पण आता टवाळक्या करणाऱ्या लोकांची पोलिसांनी चक्क पूजाच केली आहे. घराबाहेर कारण नसताना हिंडणाऱ्या दुचाकीस्वारांची पोलिसांनी पूजा केली, त्यांची आरती ओवाळली आणि नंतर त्यांना फटक्यांचा प्रसाद दिला आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता कशाप्रकारे पोलीस टवाळखोरांची धुलाई करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खरंतर घरातून बाहेर निघून लोक या आजाराला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे असं बाहेर पडून गर्दी करू नका असं आवाहन वारंवार करण्यात असूनही लोक नियमांचं उल्लंघन करतात. त्यामुळे पोलिसांवरील ताणही वाढत आहे.

दरम्यान, असा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण सरकार आणि पोलिसांचे सर्व नियम धाब्यावर बसवून बिनधास्त विहिरीमध्ये पोहायला गेले आहेत. सरकार वारंवर घरात बसा असं सांगत असतानाही जीव धोक्यात घालून हे सर्वजण मजा करत होते. याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली त्यांनी घटनास्थळी पोहोचून विहिरीत पोहणाऱ्या या तरुणांना लाठीचा प्रसाद दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या