JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / लग्नाला जाण्यासाठी बंदूक साफ करत होते BJP नेता, अचानक सुटली गोळी आणि...

लग्नाला जाण्यासाठी बंदूक साफ करत होते BJP नेता, अचानक सुटली गोळी आणि...

लग्नाला जाण्यासाठी परवाना रायफल साफ करताना चुकून त्यातून गोळी सुटली आणि

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ग्वालियर, 15 जून : हत्यारांविषयी थोडा निष्काळजीपणा केला तर थेट मृत्यूच्या दारी पोहोचतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाला जाण्यासाठी परवाना रायफल साफ करताना चुकून त्यातून गोळी सुटली आणि थेट भाजप नेते सुरेंद्र मिश्रा यांच्या छातीवर लागली. कुटुंबियांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं जिथे 3 तासांच्या उपचारानंतर मिश्रा यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खुशीत सहभागी होणाऱ्या भाजप नेत्याच्या कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. मुलगा आणि पत्नीने ऐकला गोळीचा आवाज सुरेंद्र मिश्रा हे बंदूक साफ करत असताना अचानक त्यातून गोळी फायर झाली. ती त्यांच्या छातीत जाऊन लागली. गोळीबाराचा आवाज ऐकताच मिश्रा यांचा मुलगा आणि पत्नी पहिल्या मजल्यावर पोहोचले. जिथे खोलीत सुरेंद्र मिश्रा जखमी झाले होते. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ दवाखान्यात नेलं. तिथे डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगताच जैरोग्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. 3 तासांच्या उपचारानंतर मिश्रा यांचा मृत्यू झाला. रायफल लोड होती याबद्दल नव्हत माहिती घटनेची माहिती मिळताच महाराजपुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परवाना रायफल आपल्या ताब्यात घेतली, त्यात एक गोळी असल्याचं त्यांनी सांगितलं. 12 बोअरच्या रायफलमध्ये 2 गोळ्या होत्या अशी माहिती कुटुंबियांनी दिली. तर मिश्रा यांना रायफल लोड होती याची कल्पना नव्हती. याप्रकरणी महाराजपुरा पोलिसांनी तपास सुरू केला असून कुटुंबियांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या