नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 16 फेब्रुवारीला वाराणसी ते काशी महाकाल एक्सप्रेसचं उद्घाटन केलं आहे. ज्यामध्ये एक सीट ही भगवान शंकरासाठी कायमची आरक्षित करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस दोन राज्यांच्या तीन ज्योतिर्लिंगांची यात्रा करेल. या यात्रेदरम्यान, रेल्वेमध्ये शंकरासाठी एक जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. ट्रेनमध्ये भगवान शंकर यांच्यासाठी जागा आरक्षित करण्याच्या नव्या कल्पनेनंतर रेल्वे प्रशासनातर्फे ट्रेन कायमस्वरूपी ‘भोले बाबा’ साठी राखीव ठेवण्याचा विचार केला जात आहे. ही ट्रेन इंदौरजवळील ओंकारेश्वर, उज्जैनमधील महाकालेश्वर आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ यांना जोडेल. मोदींच्या या निर्णयामुळे शंकर भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
पीएम मोदी यांनी उद्घाटन केले आणि काशी महाकाल एक्स्प्रेस कॅंटपासून झाली सुरू उत्तर रेल्वेचे प्रवक्ते दीपक कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, कोच क्रमांक बी 5 मधील 64 क्रमांक जागा भगवान शंकरासाठी रिकामी करण्यात आली आहे. रेल्वेने तिसरे आयआरसीटीसी संचालित सेवा सुरू केली आहे. ही ट्रेन उत्तर प्रदेशमधील वाराणसीहून मध्य प्रदेशातील इंदूरकडे जाईल.
कुमार म्हणाले की, “भगवान शिव यांच्यासाठी जागा आरक्षित आणि रिक्त ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या सीटावर एक मंदिर तयार करण्यात आलं आहे. जेणेकरून रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या भाविकांच्या हे लक्षात येईल की जागा उज्जैनच्या महाकाळसाठी आहे. तर कायमस्वरूपी ही जागा शंकरासाठी आरक्षित ठेवण्याचा विचार आम्ही करत असल्याचंही कुमार म्हणाले. वाराणसी ते इंदूर दरम्यान आठवड्यातून तीनदा धावणाऱ्या या ट्रेनमध्ये भक्तिभावाने संगीत वाजवले जाईल आणि प्रत्येक कोचमध्ये दोन खासगी रक्षक असतील आणि प्रवाशांना शाकाहारी भोजन दिले जाईल.