JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / लॉकडाऊनमध्ये मशिदीत जाणं पडलं महागात, नमाजनंतर पोलिसांनी अशी केली धुलाई, पाहा हा VIDEO

लॉकडाऊनमध्ये मशिदीत जाणं पडलं महागात, नमाजनंतर पोलिसांनी अशी केली धुलाई, पाहा हा VIDEO

लॉकडाऊनदरम्यान सर्व प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र अनेकजण बंदचं उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बेळगाव, 26 मार्च : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्ग वाढीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे. असे असूनही, काही लोक त्याचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. अनेकजण विविध कारण सांगून सतत घराबाहेर पडत आहेत. पोलिसांकडून अशा लोकांवर कारवाई केली जात आहे. लोकांना सांगूनही ते ऐकत नसल्याने अनेक ठिकाणी पोलिसांकडून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना चोप दिला जात आहे.  कर्नाटकातील बेळगावमध्येही असेच दृश्य दिसून आले आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करत अनेक लोक नमाजसाठी मशिदीत दाखल झाले. स्थानिक पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई केली आणि नमाजनंतर मशिदीतून बाहेर पडताना त्यांची चांगलीच धुलाई केली.

लॉकडाऊन दरम्यान मंदिर-मशिदीला भेट देण्यास देखील मनाई आहे. संबंधित -  धक्कादायक! तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर कंटेनरमध्ये कोंबून नागरिकांची वाहतूक सोशल डिस्टन्सिंग महत्वाचे आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, कोरोना टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. म्हणूनच लोकांनी घरात राहणे फार महत्वाचे आहे. असे असूनही, असे बरेच लोक बंदीचे उल्लंघन करून घराबाहेर पडत आहेत. राजस्थानमधील प्रतापगञ येथील पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या तरुणांना रस्त्यावर कोंबडा बनविण्यात आला. राजस्थानव्यतिरिक्त अन्य राज्यांमध्येही पोलीस विविध पद्धतीने लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाई करीत आहे आणि लोकांना घरात राहण्याची अपील केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या