JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Kiran Mane: 'मराठी इंडस्ट्रीत तुला...' निळू फुलेंचं भाकीत खरं ठरलं, किरण मानेंची नवी पोस्ट चर्चेत

Kiran Mane: 'मराठी इंडस्ट्रीत तुला...' निळू फुलेंचं भाकीत खरं ठरलं, किरण मानेंची नवी पोस्ट चर्चेत

किरण माने आणि मराठीतील दिग्गज अभिनेते निळू फुले यांचं खास नात होतं. आज निळूभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त किरण मानेंनी त्यांची खास आठवण आणि त्यांनी वर्तवलेल्या भाकिताविषयी पोस्ट शेअर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जुलै: आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे अभिनेते किरण माने सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतात. त्यांच्या लिखाणातूनही त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे. किरण माने सोशल मीडियावर नेहमीच व्यक्त होत असतात. त्यांच्या पोस्ट वाचायला त्यांचा चाहत्यांना देखील आवडतं. मध्यंतरीच्या काळात मुलगी झाली हो मालिकेच्या वादामुळे किरण माने यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. मात्र ते कधीही डगमगले नाही. त्यांनी या सगळ्याला धीरानं आणि जिद्दीनं तोंड दिलं. त्यांच्याबरोबर झालेल्या या प्रकरणामुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्याबरोबर असं घडू शकतो आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो याच भाकित आधीच केलं होतं असं किरण माने यांनी म्हटलं आहे. (Kiran Mane New Post) किरण मानेंनी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांची याविषयी सांगितलं आहे. किरण माने आणि मराठीतील दिग्गज अभिनेते निळू फुले यांचं खास नात होतं. किरण मानेंवर निळू भाऊंचा प्रचंड प्रभाव आहे. त्यांच्यासाठी ते आदर्श आहेत. आज निळू भाऊ यांची पुण्यतिथी आहे. त्यांना जाऊन तब्बल 13 वर्ष झाली. यानिमित्तानं किरण मानेंनी निळू भाऊंबरोबरचा एक जुना फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना त्यांच्या शिकवणीला उजाळा दिला आहे. हेही वाचा - IPS विश्वास नांगरे पाटलांचं ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याशी आहे खास कनेक्शन; घेतलंय एकत्र शिक्षण निळू भाऊ अनेकवेळा किरण मानेंना भेटायला त्यांच्या घरी जात असतं. दोघांचं अनेक विषयावर बोलणं व्हायचं अनेक वेळ चर्चा व्हायच्या. या काळात निळू भाऊंनी किरण मानेंना अनेक गोष्टी सांगिलतल्या. त्यातल्या अनेक गोष्टी आज खऱ्या देखील ठरल्या आहेत. किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय, ‘निळूभाऊ कधीबी अचानक माझ्या सातारच्या घरी यायचे, मला जो काही छोटासा सहभाग लाभला त्यात या महान अभिनेत्यानं ‘जगणं’ शिकवलं.आपली मराठी इंडस्ट्री कशी आहे, मला पुढं जाऊन काय त्रास होऊ शकतो  याचं भाकित भाऊंनी त्यावेळी केलं होतं ! मी तरीबी हार न मानता, या त्रासाला कसं उत्तर देत संघर्ष करायची गरजय, याचा कानमंत्रबी दिला होता. त्याचा आज लै लै लै उपयोग होतोय’. किरण माने निळू भाऊंविषयी म्हटलंय,  ‘निळूभाऊ कधीबी अचानक माझ्या सातारच्या घरी यायचे ! मी लहान नट. पन लै आरामात गप्पा मारायचे माझ्याशी. आपल्या मोठेपनाचं समोरच्यावर कुठलंबी दडपन येऊ न देनारा दिलखुलास मानूस. पं. सत्यदेव दूबेजींच्या वर्कशॉपनंतर पुण्यात माझा एक कवितावाचनाचा कार्यक्रम झाला. तो बघायला निळूभाऊ आलेवते. तवापास्नं का कुनास ठावूक? भाऊ कायम माझ्या संपर्कात राहीले. लै भारी गप्पा व्हायच्या. पन ते सातारला माझ्याकडं आले किंवा मी पुण्यातल्या त्यांच्या घरी गेलो काही क्षण मी भारावल्यासारखा असायचो. मला खरंच वाटायचं नाय, साक्षात निळू फुले माझ्याशी बोलत्यात !’ किरण मानेंनी पुढं म्हटलंय, परीपूर्ण ‘नट’ कसा असावा? असा प्रश्न कुनी विचारल्यावर माझ्या डोळ्यापुढं मराठीतलं एकमेव नांव येतं - निळू फुले ! नटानं आपल्या भवताली घडणार्‍या छोट्यामोठ्या घटना, राजकारण, समाजकारण, कला, क्रिडा, साहित्य सगळ्या-सगळ्या गोष्टींबद्दल भान ठेवायला पायजे हे निळूभाऊंकडनं शिकलो. सशक्त नट घडतो तो भवतालाच्या वाचनातूनच. मी प्रत्यक्ष भेटल्यावर ‘मानूस’ म्हनून भाऊंच्या जास्त प्रेमात पडलो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या