JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / कपिल पाटील यांची विजयाची हॅट्ट्रिक,भाजप-सेना पराभूत

कपिल पाटील यांची विजयाची हॅट्ट्रिक,भाजप-सेना पराभूत

शिक्षक मतदार संघात भाजप पुरस्कृत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे उमेदवार अनिल देशमुख यांचा दारुण पराभव झालाय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जून :  मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी विजयाची हॅट्ट्रिक केलीय. मुंबई शिक्षक मतदारसंघाचा हा गड लोकभारतीचे कपिल पाटील यांनी राखला. कपिल पाटील यांनी शिवसेनेचे शिवाजी शेंडगे आणि भाजप पुरस्कृत अनिल देशमुख यांचा पराभव केला. शिक्षक मतदार संघात भाजप पुरस्कृत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे उमेदवार अनिल देशमुख यांचा दारुण पराभव झालाय. अनिल देशमुख हे तिसऱ्या क्रमाकांवर फेकले गेले.  कपिल पाटील यांना 4050 मतं मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार शिवाजी शेंडगे यांना 1736 तर अनिल देशमुख यांना 1124 मतं मिळाली. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत विनोद तावडे विरुद्ध कपिल पाटील असा आखाडा रंगला होता. यातकपिल पाटील यांचा दणदणीत विजय झालाय. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावघरे आघाडीवर आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघात विलास पोतनिस आघाडीवर आहेत. विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांनी 20 हजार मतांमध्ये साडेचार हजार मतांनी आघाडी घेतली. चार जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे. हेही वाचा

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, महिला पायलटसह 5 जणांचा मृत्यू

  VIDEO : विमान कोसळण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद Ghatkopar Plane Crash : तो अर्धा तास..,विमान दुर्घटनेचा घटनाक्रम

  Ghatkopar Plane Crash : नवखी होती विमानसेवा देणारी कंपनी

  काय घडलं घाटकोपरमध्ये? : प्रचंड स्फोट, आगीचे लोट आणि घाबरलेले जीव

चार्टर्ड विमानाच्या अपघातानंतर नक्की काय घडलं?

  कसा झाला चार्टर्ड विमानाचा अपघात?

  घाटकोपर विमान अपघात : थोडक्यात वाचला 40 कामगारांचा जीव, नाही तर…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या