नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान पूर्णतः बिथरला आहे. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी काश्मीरचा मुद्दा वारंवार आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला. पण प्रत्येक ठिकाणी त्यांना दणकाच मिळाला. यातच आता पाकिस्तान सर्वात मोठा झटका मिळालाय. कारण पाकच्या कुरापतींची नेहमीच पाठराखण करणाऱ्या चीननं देखील आता साथ सोडल्याचं दिसत आहे. काश्मीर मुद्यावर चर्चा नाही येत्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग एका अनौपचारिक संमेलनात भेटणार आहेत. पण या भेटीदरम्यान काश्मीर मुद्यावर कोणतीही चर्चा होणार नाही. चीनमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा करावी, हे पूर्णतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्षी जिनपिंग यांच्यावर अवलंबून आहे. पुढील महिन्यात या दोघांची भेट होणार आहे. (वाचा : लवकरच पाक व्याप्त काश्मीर भारताचा भौगोलिक भाग असेल; मंत्र्यांचे मोठं वक्तव्य!) चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानुसार, मोदी-जिनपिंग भेटीदरम्यान काश्मीर मुद्यावर चर्चा होईल, असं मला वाटत नाही. अनौपचारिक संमेलनात कोणत्या मुद्यांवर चर्चा करावी, या दोन्ही नेत्यांवर अवलंबून असतं. काही दिवसांपूर्वी चीननं पाकिस्तानला पाठिंबा दर्शवत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. पण येथेही दोन्ही देशांच्या पदरी निराशाच पडली होती. वाचा : पाकिस्तानचा खोटेपणा उघड : Airstrike संदर्भात लपवलेल्या सत्याचे हे पुरावे कोणत्या मुद्यांवर होणार चर्चा? वुहान भेटीदरम्यान ज्या मुद्यांवर चर्चा झाली होती, त्याच बाबींवर या अनौपचारिक संमेलनात बातचित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. वुहानमध्ये दोन्ही देशांनी डोकलाम मुद्यावर चर्चा केली होती. 2017मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये 73 दिवस डोकलामवरून वाद सुरू होता. (वाचा : दलित असल्यानं BJPच्या खासदाराला गावात येण्यापासून रोखलं, पोलीस चौकशी सुरू ) SPECIAL REPORT: भुजबळ आणि राणेंच्या पक्ष प्रवेशावर भाजप सेनेतही चेकमेट!