JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद, दोन मुली आणि सहा महिन्याचा मुलगा झाला पोरका

महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद, दोन मुली आणि सहा महिन्याचा मुलगा झाला पोरका

पुन्हा चीनने नदीच्या पाण्याचा हत्याराप्रमाणे वापर केल्यामुळे मालेगाव छटा साकुरी झाप इथल्या सचिन मोरे या जवानाला वीरमरण आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मालेगाव, 25 जून : चिनी सैनिकांकडून घुसखोरीच्या घटना वाढल्यानं लडाखच्या गलवान खोऱ्यात तणावपूर्ण वातावरण आहे. याठिकाणी झालेल्या हिंसाचारामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा चीनने नदीच्या पाण्याचा हत्याराप्रमाणे वापर केल्यामुळे मालेगाव छटा साकुरी झाप इथल्या सचिन मोरे या जवानाला वीरमरण आलं आहे. सीमेलगत भागात नदीवर पूल बांधणीचं काम सुरू असताना चीनने रोखलेला पाण्याचा प्रवाह सोडला. अचानक पाणी पातळी वाढून प्रवाहात तीन भारतीय जवान सापडले. त्यांना वाचवण्यासाठी सचिन मोरे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, खाली मोठ्या दगडावर पडल्याने त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या मृत्यूचं वृत्त येताच आई, वडील, पत्नी, भाऊसह इतर नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद सचिन मोरे हे एसपी- 115 रेजिमेंट अंतर्गत लडाख सीमेवर साधारण वर्षभरापासून तैनात होते. सुमारे 17 वर्ष अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी दोन मुली व सहा महिन्याचा मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. मोरे यांचं पार्थिव शुक्रवारी रात्री पुणे इथं तर शनिवारी साकुरी इथं आणल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या