मुंबई, 1 जून : मुंबईतील कोरोना रुग्णाच्या संख्येवर नियंत्रण आणणं हे सरकारसाठी मोठं आव्हान ठरत आहे. धारावीसह जी उत्तर प्रभागात रुग्णसंख्येनं 3 हजारांचा आकडा पार केला. जी उत्तर मध्ये 3065 रुग्ण तर कुर्ला मध्ये त्याखालोखाल 2668 रुग्ण आहेत. तर 9 प्रभागात 2000 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर आतापर्यंत कमी रुग्णसंख्या असलेल्या दहिसर म्हणजेच आर मध्य प्रभागात रुग्णसंख्या 300 हुन मागच्या काही दिवसात 868 वर पोहोचली आहे. सध्या सी वॉर्डात सगळ्यात कमी म्हणजेच 432 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबई आणि परिसरात कोरनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने महापालिका आणि प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केलीय. रुग्णांची वाढती गरज लक्षात घेऊन मुंबईतल्यी बीकेसी मैदानावर 1000 बेडच्या हॉस्पिटलची उभारणी अतिशय वेगात सुरू आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स आणि तंत्रज्ञांच्या मदतीने हे तात्पुरतं हॉस्पिटल उभारलं जात आहे. याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून त्याचा खास व्हिडीओ पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शेअर केलाय. त्यावरून त्या कामाचा झपाटा लक्षात येतो. MMRDA हे हॉस्पिटल उभारत आहेत. ज्युपिटर हॉस्पिटल त्यासाठी मदत करत आहे. या ठिकाणी कोव्हिड रूग्णांसाठी 900 अलगीकरण, 100 आयसीयू आणि 50 डायलिसिस बेड्स असणार आहेत. हे हॉस्पिटल उभारण्यासाठी शेकडो कामगार, तंत्रज्ञ, डॉक्टर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. ज्या वेगाने आणि जिद्दीने हे हॉस्पिटल उभारण्यात येत आहे त्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी MMRDA आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. हे वाचा- कोरोनाच्या संकटात जनऔषधीमुळे झाली मोठी मदत; जनतेचे वाचले तब्बल 800 कोटी रुपये भाजपने सुरू केली ‘महिला आत्मानिर्भर योजना’; देवेंद्र फडणवीसांनी केला शुभारंभ