JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / धान्यं-कडधान्यांवर असू शकतो कोरोनाव्हायरस, तज्ज्ञांनी सांगितली अशी खबरदारी घ्या

धान्यं-कडधान्यांवर असू शकतो कोरोनाव्हायरस, तज्ज्ञांनी सांगितली अशी खबरदारी घ्या

Coronavirus चा धोका टाळण्यासाठी कोणतीही वस्तू नीट धुणं आणि पदार्थ नीट शिजवणं गरजेचं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 एप्रिल : एखाद्या पृष्ठभागावर कोरोनाव्हायरस (coronavirus) विशिष्ट वेळ जिवंत राहतो. त्यामुळे सर्व वस्तू sanitize करण्याचा सल्ला दिला जातो आहे. अगदी फळं-भाज्यांवरही हा व्हायरस असू शकतो, त्यामुळे त्या नीट स्वच्छ धुवून घ्यावा असं सांगितलं जातं आहे. मग धान्यं, कडधान्यं, डाळींवरही हा व्हायरस असू शकतो ना? असा प्रश्न प्र्त्येकाला पडला आहे. तज्ज्ञांच्या मते, धान्यं, कडधान्यं, डाळींवरही व्हायरस असू शकतो. जर कोरोनाग्रस्त व्यक्ती खोकताना किंवा शिंकताना त्याचे थेंब यावर पडले असतील किंवा अशा व्यक्तीच्या व्हायरस असलेल्या हातांनी याला स्पर्श केला असेल तर यावर व्हायरस असू शकतो. मग आता हे पदार्थ sanitize करणं तर शक्य नाही. मग कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी नेमकं काय करायचं? रद्द झालेल्या लग्नाची कथा! कोरोनामुळे बोहोल्यावरून नवरदेव रुग्णालयात तर वऱ्हाडी न्यूज 18 लोकमतशी बोलताना महाराष्ट्र IMA चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, “डाळी, कडधान्यं, तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत. जेणेकरून त्याच्यावर व्हायरस राहणार नाही. त्यानंतर ते शिजवल्यानंतर व्हायरसचा धोका अजिबात नसतो. गव्हाचा विचार केल्यास गहू धुण्याची गरज नाही. गहू न धुता तुम्ही पीठ दळू शकता. मात्र जेव्हा या पीठापासून तुम्ही पोळ्या बनवाल तेव्हा मात्र आवश्यक ती काळजी घ्या” “पीठ मळण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. पोळपाट-लाटणंही नीट धुवून घ्या आणि पोळ्या लाटून त्या नीट शेकवून घ्या. हे सर्व झाल्यानंतरही हात पुन्हा नीट स्वच्छ धुवा. अशी काळजी घेतल्यास तुम्हाला कोरोनाव्हायरसचा कोणताही धोका राहणार नाही, असा सल्ला डॉ. भोंडवे यांनी दिला आहे. कोरोनाशी लढणाऱ्या भारताचं महिलेनं केलं कौतुक, अमेरिकेत दाखल केला गुन्हा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या