JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / '..म्हणून राज्यपाल असं बोलले असतील'; शिवाजी महाराजांबद्दलच्या त्या वक्त्यावर गुलाबराव पाटलांची सारवासारव

'..म्हणून राज्यपाल असं बोलले असतील'; शिवाजी महाराजांबद्दलच्या त्या वक्त्यावर गुलाबराव पाटलांची सारवासारव

गुलाबराव पाटील म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. यावेळी जी कामे होत आहेत ती चांगल्या पद्धतीने नितीन गडकरी करत असल्याने राज्यपालांची ही भावना असेल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव 20 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याने आता पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका केली जात आहे. ’ छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत’, असं राज्यपालांनी म्हटलं होतं. या प्रकरणावर आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुलभाई तुम्ही घरवालीचे तरी XXX.. सुषमा अंधारे यांची सत्तांरांवर आक्षेपार्ह टीका गुलाबराव पाटील म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. यावेळी जी कामे होत आहेत ती चांगल्या पद्धतीने नितीन गडकरी करत असल्याने राज्यपालांची ही भावना असेल. या काळात चांगली कामे होत असल्याने राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला असावा, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. याशिवाय गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना विरोधकांवरही शायरीतून निशाणा साधला आहे. “बदनाम तो वो होते है जो बदनामी से डरते है . हम तो वो है जिसे बदनामी डरती है " अशा आपल्या खास अंदाजामध्ये गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तर आम्ही मुसलमानांच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मात्र विरोधकांच्या या आरोपालाही गुलाबराव पाटलांनी आपल्या खास शयारीत उत्तर दिले आहे. ….तर ते तेव्हाच ‘मविआतून’ बाहेर…सावरकरांच्या मुद्द्यावर नरेश मस्के आक्रमक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री आणि आमदार 21 तारखेला गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र आता तारखेत बदल करण्यात आला आहे. 21 नोव्हेंबर ऐवजी लवकरच नवीन तारीख जाहीर होणार असून नवीन तारीख आल्यावर गुवाहाटीला जाण्याबाबत निर्णय होईल, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या