नवी दिल्ली, 31 मार्च : वित्तीय वर्षात (financial year) वाढ करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक पत्रकही दाखवलं जात आहे. पण हे पत्रक खोटं असून ही निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं आहे. एक नवीन फसवे पत्रक फरवले जात आहे. भारतीय मुद्रांक अधिनियमात करण्यात आलेल्या काही सुधारणांच्या संदर्भात 30 मार्च 2020 रोजी भारत सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेचा चुकीचा वापर केला जात आहे. आर्थिक वर्षाची मुदतवाढ करण्यात आलेली नाही असा खुलासा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केला आहे. अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की ,30 मार्च 2020 रोजी महसूल विभाग, अर्थ मंत्रालय यांनी एक अधिसूचना जारी केली होती. जी भारतीय मुद्रांक अधिनियमातील काही दुरुस्तींशी संबंधित आहे. स्टॉक एक्सचेंज किंवा क्लीयरिंग कॉर्पोरेशन मार्फत स्टॉक एक्सचेंज डिपॉझिटरीज द्वारा अधिकृत सुरक्षा बाजार उपकरणे, व्यवहारांवर मुद्रांक शुल्क जमा करण्यासाठी एक कार्यक्षम यंत्रणा ठेवणे. हा बदल यापूर्वी 1 एप्रिल 2020 पासून अंमलात आणण्यास अधिसूचित करण्यात आला होता. तथापि, सध्याच्या परिस्थितीमुळे अंमलबजावणीची तारीख आता 1 जुलै 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. पण या सगळ्याचा वापर करून नेटकऱ्यांनी खोटं पत्रक तयार केलं आणि माहितीचा चुकीचा वापर केल्याचं केंद्रीय मंत्रालयाने म्हटलं आहे. त्यामुळे अशा कोणत्याही अफवावंवर विश्वास ठेऊ नका आणि घरी राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे आदेश देण्यात आले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 1251 वर कोरोनाव्हायरस देशात फैलाव वाढत आहे. सोमवारी लॉकडाउनचा 6 वा दिवस होता, परंतु संक्रमित लोकांची संख्या वाढतच गेली. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार संक्रमित लोकांची संख्या आतापर्यंत 1251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1117 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर मातही केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक लोक संक्रमित झाले आहेत. सोमवारी महाराष्ट्रात 216 लोक संसर्गित झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला.